Team India : वर्ल्ड कप संघातून डच्चू, मग वडिलांचं निधन, कठीण काळातून जातोय टीम इंडियाचा स्टार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकून नवा विश्वविक्रम केला आहे. लागोपाठ दुसरा आणि एकूण तिसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरली आहे.
मुंबई : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकून नवा विश्वविक्रम केला आहे. लागोपाठ दुसरा आणि एकूण तिसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच टीम ठरली आहे. या वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, पण वर्ल्ड कपच्या आधी शेवटच्या क्षणी जितेश शर्मा हा टीममधून बाहेर झाला. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर जितेश शर्माने टी-20 वर्ल्ड कप टीममधून डच्चू मिळाल्याबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
टी-20 वर्ल्ड कप टीमची घोषणा होईपर्यंत जितेश शर्मा भारतीय टीमचा भाग होता, पण इशान किशनची टीम इंडियात एन्ट्री झाली आणि संजू सॅमसन हादेखील विकेट कीपर असल्यामुळे जितेशला वर्ल्ड कप टीममधून बाहेर केलं गेलं. जितेशने काहीही चूक केली नाही, पण टीम मॅनेजमेंटला टॉप ऑर्डरमध्ये एक विकेट कीपर हवा होता, त्यामुळे जितेशला बाहेर करावं लागल्याची प्रतिक्रिया अजित आगरकरने दिली होती.
advertisement
VIDEO | India cricketer Jitesh Sharma opens up on missing out on India’s title-winning squad for the ICC T20 World Cup 2026.
“I’m also a human, so I did feel sad initially. But my family and friends supported me a lot and that phase passed. My father fell ill and passed away on… pic.twitter.com/HoGJACXsOz
— Press Trust of India (@PTI_News) March 11, 2026
advertisement
जितेशच्या वडिलांचं निधन
'मला जेव्हा बातमी कळाली तेव्हा वाईट वाटलं, मीदेखील माणूसच आहे. पण वेळ जसा पुढे गेला तसा माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला पाठिंबा दिला, त्यामुळे वाईट काळ छोटा होता. नंतर माझे वडील आजारी पडले आणि 1 फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं. मी 7 दिवस त्यांच्यासोबत होतो. माझ्या वडिलांना वर्ल्ड कपपेक्षा मी जास्त हवा होतो', असं जितेश शर्मा म्हणाला आहे.
advertisement
'मला कोणाबद्दलही दुःख किंवा पश्चात्ताप नाही. मी रागावलो नाही. देवाने मला माझ्या वडिलांसोबत 7 दिवस राहण्याची संधी दिली याबद्दल मी आभारी आहे. मी त्यांची काळजी घेऊ शकलो. मला घरी राहून वर्ल्ड कप पाहू शकलो. टीव्हीवरून वर्ल्ड कप पाहणे खूप वेगळे आहे. मी खेळाडूंसाठी खूप आनंदी आहे कारण आशिया कपपासून प्रशिक्षक आणि कॅप्टनने स्वप्न पाहिलं होतं, त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि त्यांनी या ध्येयासाठी खूप मेहनत घेतली आहे', अशी प्रतिक्रिया जितेश शर्माने दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 9:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : वर्ल्ड कप संघातून डच्चू, मग वडिलांचं निधन, कठीण काळातून जातोय टीम इंडियाचा स्टार








