Samsung Galaxy S26 सीरीज प्रायव्हसी डिस्प्लेसह लॉन्च! इतर फीचर्सही जबरदस्त
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Samsung Galaxy Unpacked 2026: सॅमसंगने 6 सीरीजचे 3 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या सीरीजअंतर्गत कंपनीने Galaxy S26, Galaxy S26+ आणि Galaxy S26 Ultra सादर केले आहेत.
Samsung Galaxy Unpacked 2026: दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने अमेरिकेच्या सॅन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित आपल्या 'गॅलेक्सी अनपॅक्ड' इव्हेंटमध्ये स्मार्टफोन सीरीज Galaxy S26 लॉन्च केली आहे.या सीरीज अंतर्गत कंपनीने Galaxy S26, Galaxy S26+ आणि Galaxy S26 Ultra सादर केले आहे. या व्यतिरिक्त कंपनीने नवीन Galaxy Buds 4 आणि Galaxy Buds 4 Pro ही लॉन्च केले आहेत.
सॅमसंगचे सीईओ टीएम रोह म्हणाले की Galaxy S26 लाइनअप हा जगातील पहिला "एजंटिएंट AI फोन" आहे. ते म्हणाले, "अशा फोनची कल्पना करा जो तुमच्या गरजा पूर्ण करण्यापूर्वीच ओळखतो. असा फोन जो तुमच्या सवयी शिकतो आणि रिअल-टाइममध्ये जुळवून घेतो. असा फोन जो तुमच्या वतीने काम देखील करू शकतो."
शेजारच्याला स्क्रिनही दिसणार नाही
advertisement
Galaxy S26 Ultra मध्ये नवीन 'प्रायव्हसी डिस्प्ले' टेक्नॉलॉजी दिली आहे. जी फोनच्या मालका व्यतिरिक्त इतराना स्क्रिनच्या खास भागांना काळे करते. याचा अर्थ असा की, कोणी तुमच्या शेजारी उभा असेल तर त्याला तुमच्या फोनमधील काहीच दिसणार नाही. त्याला स्क्रिन काळी दिसेल. स्क्रिन फक्त तुम्हालाच दिसेल.
advertisement
विक्री 11 मार्चपासून सुरू होईल
Galaxy S26 सीरीज तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: S26, S26 Plus आणि S26 Ultra. कंपनीने बुधवारी प्री-ऑर्डर सुरू केल्या आणि 11 मार्चपासून ही उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध होतील. S26 आणि S26 Plusची किंमत 100 डॉलरने वाढवण्यात आली आहे.
दोन नवीन ईयरबड्स Galaxy Buds 4 आणि Buds 4 Pro ही लॉन्च
advertisement
Galaxy S26 सीरीज व्यतिरिक्त सॅमसंगने दोन नवीन ईयरबड्स Galaxy Buds 4 आणि Buds 4 Pro ही लॉन्च केले आहेत. ज्यांना एक नवीन फोनसह सहज पेयर केलं जाऊ शकेल.
Samsung Galaxy S26 Ultra ची किंमत
12GB + 256GB – 1,39,999 रुपये
12GB + 512GB – 1,59,999 रुपये
16GB + 1TB – 1,89,999 रुपये
advertisement
Samsung Galaxy S26+ ची किंमत
12GB + 256GB – 1,19,999 रुपये
12GB + 512GB – 1,39,999 रुपये
Samsung Galaxy S26 ची किंमत
12GB + 256GB – 87,999 रुपये
12GB + 512GB – 1,07,999 रुपये
Galaxy Buds 4 आणि Galaxy Buds 4 Pro ची किंमत
Galaxy Buds 4 Pro – 22,999 रुपये
advertisement
Galaxy Buds 4 – 16,999 रुपये
Samsung Galaxy S26 Ultra लाँच होण्यापूर्वी दुबईमध्ये विक्रीसाठी होता
Galaxy S26 सिरीज लाँच होण्यापूर्वीच, YouTuber Sahil Karaul Sahil ने एक धक्कादायक दावा केला होता. एका दुकानाचा फोटो शेअर करताना, साहिलने दावा केला की त्याने तो आधीच स्टॉक केला होता आणि फोन आधीच विक्रीसाठी होता. अलीकडेच, साहिलने दुबईमध्ये Samsung Galaxy S26 Ultra खरेदी केला आणि जगाला दाखवण्यासाठी तो अनबॉक्स केला होता.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 4:59 PM IST








