'बरं झालं तू माझी मुलगी नाहीस...', सासूने सुनेला लिहिलेलं पत्र, सासऱ्यांनी वाचलं, ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी

Last Updated:

Mother in law letter to daughter in law birthday : सुनेच्या वाढदिवशी सासूने दिलेलं हे पत्राचं सरप्राईझ. सासऱ्यांनी सगळ्यांसमोर हे पत्र वाचून दाखवलं आहे. पत्रात सासूने असं काही लिहिलं की सून ढसाढसा रडू लागली.

News18
News18
मुंबई : सासू आणि सूनेचं नातं म्हणजे टॉम अँड जेरी, साप आणि मुंगसासारखं. असं म्हणतात की सून कधी मुलगी होऊ शकत नाही आणि सासू कधी आई होऊ शकत नाही. पण निसर्गाला अपवाद आहेत तसे या नात्याच्या नियमाला सुद्धा अपवाद आहेत. एका सासूने चक्क आपल्या सुनेच्या वाढदिवशी असं सरप्राईझ दिलं ज्याचा कुणी कधी स्वप्नातही विचार केला नसेल. सासूने सुनेला पत्र लिहिलं. त्यात असं काही लिहिलं की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आहे,
सुनेच्या वाढदिवशी सासूने दिलेलं हे पत्राचं सरप्राईझ. सासऱ्यांनी सगळ्यांसमोर हे पत्र वाचून दाखवलं आहे. पत्रात सासूने असं काही लिहिलं की सून ढसाढसा रडू लागली. पत्र लिहिणाऱ्या सासूलाही रडू कोसळलं आणि पत्र ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यातही पाणी आलं. असं या पत्रात सासूने सुनेसाठी काय लिहिलं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता तुम्हालाही असेल.
advertisement
पत्रात काय आहे?
"मला माझी मुलगी आणि माझी सून यात काहीच फरक जाणवला नाही. तुझ्याकडून मिळणाऱ्या प्रेमाने सुनेची तू कन्या कधी झालीस हे कळलंच नाही. पण बरं झालं माझी मुलगी म्हणून तू माझ्या वाट्याला आली नाहीस, नाहीतर तूही लग्न होऊन सासरी गेली असतीस. आता तू सून असल्याने मी असेपर्यंत तुझ्याच सान्निध्यात आणि तू माझ्या सदैव जवळ राहणार आहेस. तू मला सून म्हणून लाभलीस म्हणून मी देवाचे आभार मानते. तुझा स्वभाव शांत आणि समंजस आहे. तणावपूर्ण वातावरणातही समंजसपणे आणि प्रेमाने राहतेस. योगेश बाहेर असतानाही मला मायेने, काळजीने सांभाळतेस आणि काय हवं मला. तुझ्या जेवणामुळे तू सगळ्या नातेवाईकांना आपलंसं करून घेतलंस. खरंच अन्नपूर्णा असणं किती महत्त्वाचं आहे. जेव्हा सगळे जण तुझं कौतुक करतात. खरं सांगू का मला माझाच अभिमान वाटतो. किती लिहू आणि काय काय लिहू. खरंच मी धन्य झाले."
advertisement
प्रत्येक मुलीला अशी सासू आणि प्रत्येक सासूला अशी सून मिळाली तर घर नंदनवन होईल.... असंख्य दुःख असंख्य घरफुटी थांबतील आणि केवळ आणि केवळ प्रेमाचाच नrज वर्षाव होऊन सासू रुपी आईचा आणि लक्ष्मी रुपी सुनेचा एकतत्वी ईश्वर रूपाचा अंश त्या घराला लाभेल आणि जन्मजन्मांतरी आत्मे कृतकृत्य होतील, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Anand Pimpalkar (@pimpalkaranand)



advertisement
तुमची सासू किंवा तुमची सून कशी आहे, तुमची आई आणि तुमच्या बायकोतील नातंही असंच आहे का? या व्हिडीओवर तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'बरं झालं तू माझी मुलगी नाहीस...', सासूने सुनेला लिहिलेलं पत्र, सासऱ्यांनी वाचलं, ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement