Raisins : भिजवलेल्या मनुका खाण्याचे फायदे, शरीरासाठी पौष्टिक आणि सोपा आहार, अशक्तपणा होईल कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
रोजच्या धावपळीत तुम्हीही आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर त्यामुळे नंतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. संसर्ग आणि आजारांपासून दूर राहायचं असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाणं हा चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया भिजवलेल्या मनुका खाण्याचे फायदे.
मुंबई : जेवणाबरोबरच फळं, सुका मेवा चांगल्या तब्येतीसाठी महत्त्वाचा आहे. प्रकृती उत्तम राखण्यासाठी पौष्टिक आहार आवश्यक आहे.
रोजच्या धावपळीत तुम्हीही आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर त्यामुळे नंतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. संसर्ग आणि आजारांपासून दूर राहायचं असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाणं हा चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया भिजवलेल्या मनुका खाण्याचे फायदे.
advertisement
अशक्तपणा : मनुक्यांमधे लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात, अशक्तपणाचा सामना करण्यासाठी आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी मनुका उपयुक्त ठरतात.
पोटाच्या समस्या : वारंवार बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाणं फायदेशीर ठरू शकतं. पाण्यात भिजवल्यानंतर मनुक्यांमधील फायबरचं प्रमाण आणखी परिणामकारक होतं.
ऊर्जा वाढवण्यासाठी : सकाळी अशक्तपणा जाणवत असेल तर भिजवलेले मनुके खा. त्यात नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतं. हे खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते.
advertisement
हाडांची मजबुती : वयानुसार हाडांमधे वेदना जाणवू शकतात, पण हाडं मजबूत करण्यासाठी, सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुका खाऊ शकता. त्यातलं बोरॉन आणि कॅल्शियममुळे हाडं आणि सांधे मजबूत होतात.
रक्तदाब नियंत्रण : मनुक्यांमधे पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, यामुळे शरीरातील सोडियमची पातळी संतुलित करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
advertisement
डोळ्यांचं आरोग्य : तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप स्क्रीनकडे पाहतो, ज्यामुळे आपले डोळे थकतात. भिजवलेल्या मनुक्यांमधील पॉलीफेनोलिक फायटोन्यूट्रिएंट्स डोळ्यांच्या स्नायूंना कमकुवत होण्यापासून रोखण्यास मदत करतात.
त्वचा : महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा भिजवलेल्या मनुका खाणं चांगलं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी याची मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती : बदलत्या हवामानात वारंवार आजारी पडत असाल तर भिजवलेले मनुके खा. त्यातले गुणधर्म शरीराची कमकुवत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. रात्री 8 ते 10 मनुके धुवून एका ग्लासमध्ये स्वच्छ पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यानंतर प्रथम मनुके चावून खा आणि त्याचं पाणी प्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 8:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Raisins : भिजवलेल्या मनुका खाण्याचे फायदे, शरीरासाठी पौष्टिक आणि सोपा आहार, अशक्तपणा होईल कमी






