बर्थडे आहे बायकोचा! मोठा केक, आतिषबाजी, जंगी पार्टी सगळं ठीक, पण शेवट...; कोणत्याच नवऱ्याने असं सेलिब्रेशन केलं नसेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Husband celebrate wife birthday party video : एका बर्थडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या बर्थडेसाठी ठेवलेली ही जंगी पार्टी. इतपत ठीक होतं, पण शेवट अनपेक्षित आहे. तुम्ही विचारही केला नसेल.
नवी दिल्ली : बायकोचा बर्थडे प्रत्येक नवऱ्याने लक्षात ठेवायचा विसरालात तर काही खरं नाही... असं मस्करीत म्हणतात. त्यामुळे बायकोचा बर्थडे म्हणजे कोणत्या सणापेक्षा कमी नाही असंच म्हणावं लागेल. आता बायकोचा बर्थडे म्हणजे तिला गिफ्ट देणं आलंच. काही नवऱ्यांना आपल्या बायकोचा बर्थडे अधिकच खास बनवायचा असेल तर ते जंगी पार्टीही देतात. असा एक नवरा ज्याने आपल्या बायकोच्या बर्थडेची जंगी पार्टी ठेवली पण शेवट मात्र असा की कोणत्याच नवऱ्याने केला नसेल.
एका बर्थडेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या बर्थडेसाठी ठेवलेली ही जंगी पार्टी. एखादं लग्न वाटावं इतकी ही मोठी पार्टी, व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातील एक कपल दिसतं. महिलेने व्हाइट कलरचा गाऊन घातला आहे आणि डोक्यावर प्रिन्सेससारखा ताज. दोघंही हातात स्पार्कल गन घेऊन आतिषबाजी करताना दिसतात. तसंच आकाशातही फटाके फुटतात. दोघंही मोठा केक कापतात. नवरा आपल्या बायकोला मोठा हार घालतो. हे पाहून कौतुक वाटतं. पण थांबा पिक्चर अभी बाकी है.
advertisement
शेवट पाहाल तर तुम्ही पाहतच राहाल. शेवटी बायको खुर्चीजवळ उभी दिसते आणि तिच्यासमोर उभा असलेला नवरा हातावर धूप पेटवून त्याने आपल्या बायकोला ओवाळतो, तिची आरती करतो. हे पाहून बायकोच्याही डोळ्यात पाणी येतं.
advertisement
Location :
Delhi
First Published :
September 19, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/Viral/
बर्थडे आहे बायकोचा! मोठा केक, आतिषबाजी, जंगी पार्टी सगळं ठीक, पण शेवट...; कोणत्याच नवऱ्याने असं सेलिब्रेशन केलं नसेल