Numerology: शुक्रवारी लक्ष्मी कृपेनं नशीब पालटणार; 3 मूलांकाना लाभाच्या संधी, अनपेक्षित गुडन्यूज
- Written by:Chirag Daruwalla
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: अंकशास्त्रानुसार शुक्रवारचा दिवस काही लोकांसाठी संधी घेऊन आला आहे, तर काहींसाठी आव्हानात्मक असू शकतो. मूलांक 1, 2, 3, 5 आणि 9 असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आर्थिक आणि कामाच्या दृष्टीने प्रगतीचा असेल. विशेषतः सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची वाट पाहणाऱ्यांना चांगले निकाल मिळतील. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले शुक्रवारचे दैनिक अंकशास्त्र जाणून घेऊ.
मूलांक 1 (कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुम्ही जे काही नियोजन केले आहे, ते आज यशस्वीपणे पूर्ण होईल. जे लोक सरकारी नोकरीसाठी अर्ज करू इच्छितात, त्यांच्यासाठी आजची वेळ अतिशय अनुकूल आहे. फक्त तुमच्या रागावर थोडे नियंत्रण ठेवा, अन्यथा जोडीदाराशी विनाकारण वाद होऊ शकतात. संयमाने वागल्यास कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
मूलांक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
advertisement
मूलांक 2 च्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे. आज अचानक धनलाभाचे योग आहेत. कुटुंबासोबत एखादा कार्यक्रम आखू शकता. आज तुमच्या पालकांना एखादी भेटवस्तू नक्की द्या, त्यांच्या आशीर्वादामुळे भविष्यात तुमचे आर्थिक मार्ग मोकळे होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)
आज नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि समाजात तुमचा मान वाढेल. बऱ्याच काळानंतर जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नवीन मार्ग सापडतील. आर्थिक आवक चांगली राहील, फक्त बोलताना रागावर ताबा ठेवा.
advertisement
मूलांक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
आजचा काळ तुमच्यासाठी थोडा कठीण असू शकतो. जवळच्या व्यक्तीकडून मानहानी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. विचार केल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका, तुमचे पैसे अडकू शकतात. वडिलांच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते, ज्यामुळे घरात तणाव राहील. उपाय म्हणून आज सूर्याला जल अर्पण करा.
advertisement
मूलांक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी आजचा दिवस खूप प्रगतीचा आहे. पैशांच्या आवकीचे नवीन मार्ग अचानक खुले होतील. जर तुम्ही व्यापारी असाल, तर व्यवसायात मोठी भरभराट होण्याची शक्यता आहे. एखादी गोड बातमी मिळल्यामुळे घरातील वातावरण उत्सवासारखे असेल.
advertisement
मूलांक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
तुमचा आजचा दिवस सामान्य राहील. कामात काही अडथळे येऊ शकतात. आर्थिक बाबतीत आज हात थोडा आखडता घ्यावा लागेल, कारण अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून जोडीदाराशी खटके उडू शकतात. घरातील शांततेसाठी कुटुंबासोबत मिळून एखादी छोटी पूजा आयोजित करा, फायदा होईल.
advertisement
मूलांक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)
आजचा दिवस थोडा धावपळीचा आणि अडथळ्यांचा असेल. तुमच्या कामावर किंवा नावावर शिंतोडे उडण्याची शक्यता असल्याने कोणाशीही वाद घालू नका. आर्थिक चणचण भासू शकते. जर तुमचे कोणतेही सरकारी काम प्रलंबित असेल, तर ते वेळेत पूर्ण करा, अन्यथा दंड भरावा लागू शकतो. कठीण काळात कुटुंबाची साथ मात्र तुम्हाला नक्की मिळेल.
advertisement
मूलांक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा असेल. विनाकारण खर्च वाढल्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. आरोग्याची, विशेषतः पोटाच्या तक्रारींची काळजी घ्या. घरातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयमाने वागा, अन्यथा वाद विकोपाला जाऊ शकतो.
मूलांक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)
व्यावसायिकांसाठी आजचा काळ अनुकूल आहे. व्यवसायात प्रगती झाल्यामुळे भविष्यात चांगले आर्थिक लाभ मिळतील. अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. अशा वेळी जोडीदाराशी संवाद साधताना नम्र राहा, यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2026 8:01 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: शुक्रवारी लक्ष्मी कृपेनं नशीब पालटणार; 3 मूलांकाना लाभाच्या संधी, अनपेक्षित गुडन्यूज









