Shani-Surya Yuti 2026: बॅडलक संपणार! मार्चच्या सुरुवातीलाच मीन राशीत शनि-सूर्याची युती, या राशींना दुहेरी फायदा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Surya Yuti 2026: ज्योतिषशास्त्रानुसार काही ठराविक काळानंतर ग्रह संयोग जुळून येतात. शनि आणि सूर्य एकाच राशीत एकत्र येण्याच्या स्थितीला विशेष महत्त्व आहे. शनीला कर्माचा कारक तर सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक मानलं जातं, त्यामुळे या दोन ग्रहांची युती मोठी खळबळ उडवून देऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक बाबतीत शुभ ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा जास्त मजबूत होईल. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळतील आणि नोकरीत प्रमोशन किंवा नवी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टशी जोडले जाण्याची संधी मिळू शकते.
advertisement
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल घेऊन येईल. कामाप्रती तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल अधिक गंभीर व्हाल. ऑफिस किंवा व्यवसायात तुम्ही घेतलेली मेहनत फळाला येईल आणि नवीन संधी उपलब्ध होतील. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही नवीन आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकाल. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील, तरीही खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कामांत तुमची रुची वाढेल, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे नाती घट्ट होतील, फक्त विनाकारण ताण घेऊ नका आणि मन शांत ठेवा.







