Sharad Pawar Health Update: वस्ताद पुन्हा मैदानात उतरणार! डिस्चार्ज देताच डॉक्टरांनी दिली पवारांच्या प्रकृतीबाबतची अपडेट
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sharad Pawar Health Updates: गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत असलेल्या शरद पवारांना आज रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला.
पुणे: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत असलेल्या शरद पवारांना आज रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला असून ते मुंबईला रवाना झाले आहेत. डॉ. परवेज ग्रँड यांनी पवारांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली.
'डिहायड्रेशन'मुळे झाला होता त्रास
डॉ. परवेज ग्रँड यांनी सांगितले की, "शरद पवार यांना डिहायड्रेशन इन्फेक्शन झाले होते. त्यावर आम्ही आवश्यक उपचार केले असून त्यांना सलाईन देखील लावण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि काळजीचे कोणतेही कारण नाही."
डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
शरद पवार यांना रुग्णालयातून सुटी मिळाली असली तरी डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन ते तीन दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. १५ दिवसांनंतर त्यांना पुन्हा एकदा तपासणीसाठी (Follow-up) बोलावण्यात आले आहे. त्यांना नियमित रुटीनप्रमाणे गोळ्या घेण्यास आणि पथ्य पाळण्यास सांगण्यात आले आहे. पुढील तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा एकदा आपल्या नियमित कामाला सुरुवात करू शकतील, असे डॉक्टरांनी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 25, 2026 11:25 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar Health Update: वस्ताद पुन्हा मैदानात उतरणार! डिस्चार्ज देताच डॉक्टरांनी दिली पवारांच्या प्रकृतीबाबतची अपडेट







