पतीच्या दुसऱ्या लग्नाची शॉपिंग करत होती, इथे मुलाने बापासाठी रडत रडत लिहिलं पत्र, दिग्दर्शकाच्या आयुष्यात आलेलं वादळ

Last Updated:
Bollywood Extra Marital Affairs : बॉलिवूडमधील विवाहित दिग्दर्शक एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या पत्नीनेच त्याच्या लग्नासाठी दागिने खरेदी केले होते.
1/8
मुंबई: बॉलिवूडमध्ये निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लव्ह स्टोरी खूप गाजली. १९९६ साली बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत दुसरं लग्न केलं.

advertisement
2/8
त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांच्यापासून त्यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं आहेत. हा संपूर्ण काळ बोनी कपूर यांच्यासाठी खूप कठीण होता, कारण त्यांना दोन्ही कुटुंबांमध्ये समतोल राखायचा होता.

3/8
नुकत्याच एका मुलाखतीत बोनी कपूरने एक मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, श्रीदेवीसोबतचं त्यांचं नातं त्यांनी मोना कपूरपासून कधीच लपवलं नव्हतं.

4/8
मोनाने हे नातं स्वीकारलं होतं, इतकंच नव्हे तर जेव्हा बोनी कपूर आणि श्रीदेवीचं लग्न झालं, तेव्हा त्यांच्या लग्नाच्या अंगठ्याही मोना कपूरनेच विकत घेतल्या होत्या!

5/8
बोनी कपूर यांनी मोना कपूरचं खूप कौतुक केलं. ते म्हणाले की, मोनाने कधीही दोन्ही कुटुंबांमध्ये नकारात्मकता आणण्याचा प्रयत्न केला नाही.

6/8
या काळात अर्जुन आणि अंशुलाला खूप त्रास झाला होता. तो काळ आठवताना बोनी कपूर भावूक झाले. त्यांनी सांगितलं की, त्यांना आजही अर्जुन कपूरने लिहिलेलं एक भावनिक पत्र आठवतं. त्या पत्रात अर्जुनने विचारलं होतं, “तुम्ही घरी का येत नाही?”

7/8
याबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले, “मला खूप वाईट वाटायचं, पण मी काय करू शकत होतो? मी विभागला गेलो होतो.” श्रीदेवीच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं आणि एका बाजूला त्यांची मुलं आणि मोना होती.

8/8
बोनी कपूर म्हणाले की, मुलांना त्यांच्या आईला दुःखात पाहणं आवडत नव्हतं. पण, श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन आणि अंशुलाने जान्हवी आणि खुशीला आधार दिला आणि आता ते चौघेही एकत्र आहेत. मोना कपूरचं २०१२ मध्ये निधन झालं. बोनी कपूर आजही मोनाचा खूप आदर करतात.

'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement