‘आय लव्ह मोहम्मद’ वरून वाद पेटला, मशिदीबाहेर जमाव-पोलिसांमध्ये धुमश्चक्री अन् झटापट; प्रशासन अलर्टवर

Last Updated:

I Love Mohammad campaign: बरेलीमध्ये मौलाना तौकीर रजा यांच्या आवाहनावर ‘आय लव्ह मोहम्मद’ मोहिमेसाठी गर्दी जमली होती. मात्र पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर त्यांची झटापट झाली.

News18
News18
बरेली: उत्तर प्रदेशातील बरेली येथे शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर मशिदीबाहेर जमलेल्या स्थानिक लोक आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी सांगितले की- स्थानिक धर्मगुरू आणि इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे प्रमुख मौलाना तौकीर रजा यांच्या आवाहनावर अनेक प्रदर्शनकर्ते ‘आय लव्ह मोहम्मद’ मोहिमेच्या समर्थनार्थ मशिदीबाहेर जमले होते.
advertisement
काय घडलं?
शुक्रवारी नमाज संपल्यानंतर कोतवाली परिसरातील मौलाना तौकीर यांच्या निवासस्थानाजवळ आणि मशिदीजवळ मोठी गर्दी जमली. मात्र स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे शेवटच्या क्षणी आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे संतप्त जमावाने आपला राग व्यक्त केला आणि पोलिसांशी चकमक झाली.
सोशल मीडियावर आणि टीव्ही न्यूज चॅनेल्सवर दिसलेल्या चित्रांमध्ये स्थानिक लोकांना लाठ्यांनी सज्ज पोलिसांशी झटापट करताना पाहिले गेले. दरम्यान वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
advertisement
प्रशासनाची प्रतिक्रिया
जिल्हाधिकारी अविनाश सिंह यांनी सांगितले, परिस्थिती आता पूर्णपणे सामान्य आणि नियंत्रणात आहे. कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. आम्ही लोकांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करत आहोत.
वादाची पार्श्वभूमी
या वादाची सुरुवात 9 सप्टेंबरपासून झाली. कानपूर पोलिसांनी 4 सप्टेंबर रोजी बारावफातच्या मिरवणुकीदरम्यान कानपूरमधील एका सार्वजनिक रस्त्यावर कथितरित्याआय लव्ह मोहम्मदलिहिलेले फलक लावल्याच्या आरोपावरून 9 नामजद आणि 15 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवली होती. या कृतीवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आणि हा नवा पायंडा असल्याचे म्हणत तो जाणीवपूर्वक उचकावणारा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
advertisement
AIMIM प्रमुख ओवैसींची भूमिका
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला की, ‘आय लव्ह मोहम्मद’ म्हणणे हा काही गुन्हा नाही.” यानंतर या वादाला आणखी तोंड फुटले आणि बरेलीतील घटना घडली.
advertisement
मराठी बातम्या/देश/
‘आय लव्ह मोहम्मद’ वरून वाद पेटला, मशिदीबाहेर जमाव-पोलिसांमध्ये धुमश्चक्री अन् झटापट; प्रशासन अलर्टवर
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement