Kabutarkhana: कबुतरांची फडफड उपनगरांमध्ये! मुंबईतील 13 वॉर्डांनी केले हात वर

Last Updated:

Kabutarkhana: दादर येथील कबुतरखान्याबाबत तक्रारी आल्यानंतर कोर्टाने तो बंद करण्याचा आदेश दिला होता.

Kabutarkhana: कबुतरांची फडफड उपनगरांमध्ये! मुंबईतील 13 वॉर्डांनी केले हात वर
Kabutarkhana: कबुतरांची फडफड उपनगरांमध्ये! मुंबईतील 13 वॉर्डांनी केले हात वर
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबुतरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पक्षांची इतरत्र सोय करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मुंबई शहरात जागा उपलब्ध नसल्याचे सांगत सर्व वॉर्डांनी कबुतरखाने सुरू करण्यास नकार दिला आहे. मात्र, उपनगरांतील 12 वॉर्डांनी कबुतरखाने सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता नवीन कबुतरखान्यांचं सर्व ओझं उपनगरांवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दादर येथील कबुतरखान्याबाबत तक्रारी आल्यानंतर कोर्टाने तो बंद करण्याचा आदेश दिला होता. महानगरपालिकेने त्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, काही नारिकांनी त्याला विरोध केल्याने हे प्रकरण चिघळलं होतं. त्यानंतर लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर नवीन कबुतरखाने उघडण्यासाठी जागेचा शोध घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
advertisement
बाजार आणि वर्दळीच्या भागापासून हे कबुतरखाने लांब असावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार वॉर्ड अधिकाऱ्यांनी जागांचा शोध घेतला आहे. कबुतरखान्यांसाठी जागा नसलेल्या वॉर्डमध्ये शहर भागातील ए, बी, सी, डी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण वॉर्डचा समावेश आहे. तर पश्चिम उपनगरातील एच पूर्व, के पूर्व, पी उत्तर, आर दक्षिण वॉर्डचा समावेश आहे.
advertisement
दादरमध्ये कबुतरखाना नाहीच
मुंबईतील जी उत्तर वॉर्डमध्ये दादर पश्चिम रेल्वे स्टेशनजवळील कबुतरखान्यासह आणखी 3 ठिकाणी कबुतरखाने आहेत. मात्र, दादर भागात नवीन कबुतरखाना सुरू करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
एस वॉर्डमध्ये दोन ठिकाणी नवीन कबूतरखाने तयार करण्याचा अहवाल सादर केला आहे. हे कबुतरखाने संस्थांमार्फत तयार करण्याचे नियोजन असून त्याला महापालिकेचे पाठबळ मिळणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नवीन कबुतरखाना तयार झाला आहे. मुंबईत 51 कबुतरखाने आहेत. मात्र, विधान परिषदेतील चर्चेनंतर आणि कोर्टाच्या आदेशानुसार काही कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत.
advertisement
कुठे असतील नवीन कबुतरखाने?
एच पश्चिम: वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम
के पश्चिम: विलेपार्ले,अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम, जुहू, वर्सोवा
के उत्तर: जोगेश्वरी रेल्वे स्टेशन पूर्व परिसर, शाम नगर तलाव, महाकाली गुंफा
एल: कुर्ला, साकिनाका, चांदिवली
एम पूर्व: मानखुर्द, अणुशक्ती नगर, देवनार
एम पश्चिम: चेंबूर, टिळकनगर
एन: घाटकोपर, विद्याविहार
पी दक्षिण: गोरेगाव, आरे वसाहत
advertisement
आर उत्तर: दहिसर
आर मध्य: बोरिवली
एस वॉर्ड: भांडुप, विक्रोळी, कांजुरमार्ग, नाहूर
टी वॉर्ड: मुलुंड
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kabutarkhana: कबुतरांची फडफड उपनगरांमध्ये! मुंबईतील 13 वॉर्डांनी केले हात वर
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement