Bigg Boss 19 : 'तू फ्लॉप कॉमेडीयन', मराठमोळ्या प्रणित मोरेला Bigg Boss 19च्या घरात नको नको ते बोलले; चाहते भडकले

Last Updated:

Bigg Boss 19 मध्ये अमल मलिक आणि प्रणित मोरे यांच्यात वाद चर्चेत आला आहे. मराठमोळ्या प्रणित मोरेला घरात मिळत असलेल्या वागणूकीवर अनेकांनी टीका केली आहे.

बिग बॉस १९ अपडेट
बिग बॉस १९ अपडेट
मुंबई : बिग बॉस 19 आता चौथ्या आठवड्यात पोहोचला असून घरात छोट्या-छोट्या कारणांवरून होणारे वाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. शोच्या नवीन प्रोमोमध्ये अमल मलिक आणि मराठमोळा कॉमेडीयन प्रणित मोरे यांच्यात मोठं भांडण झालं आहे. प्रणित मोरेला घरात वाईट आणि अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं त्याच्या चाहत्यांकडून बोललं जात आहे.
बिग बॉस 19 चा शेवटच्या भागात बसीर अली आणि प्रणित मोरे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगला. हा वाद लवकरच वैयक्तिक स्वरूप धारण करू लागला. बसीरनं प्रणितची थट्टा करत त्याला "डॉक्टरला भेटायला जा" असं म्हटलं. त्यावर प्रणितनं प्रत्युत्तर देत 'तू हॉस्पिटलमध्ये आहेस का' असं म्हटलं.
advertisement
तू फ्लॉप कॉमेडियन
प्रणितनं पुढे बसीरला उद्देशून “तू ड्रायव्हर आहेस घराचा, सगळ्यांना सोडून येशील का?” असा सवाल केला. यावर बसीरनं त्याला "तू फ्लॉप कॉमेडियन आहेस तुझ्या घरी परत जा" असं म्हटलं. दोघांचा वाद वाढत गेला. आणि प्रणित म्हणाला, "जहाँ से भी आया हूँ, खुद के दम पे आया हूँ." बसीरनं उपहासाने "हिरो बन रहा है" असं म्हटलं. त्यावर प्रणित म्हणाला, "हाँ, हूँ मैं हिरो." यावर बसीर म्हणाला, "नहीं है तू हिरो." त्यावर प्रणितने त्याला "सस्ता अंगरेज" असं संबोधलं.
advertisement
तर दुसरीकडे आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात अमलनं प्रणितला "जाजू" म्हटलं. प्रणित बागेत जाऊन त्याच्या समोर जाऊन आणि विचारतो, "क्या बोल रहा है भाई? जाजू हूँ मैं?" त्यावर अमल उत्तर देतो, "हाँ, तू जाजू है." यावर प्रणित म्हणतो की तो घरात काहीतरी करत आहे, अमलपेक्षा वेगळं. "तुझ्यात खूप विष भरलं आहे. तू कमी गातोस आणि जास्त आवाज काढतोस."
advertisement
advertisement
प्रणितच्या या टीकेवर अमल हसत म्हणतो, "भांड्यांसोबत तुलाही धुवून टाकीन." त्यानं पुढे प्रणितच्या विनोदांची थट्टा करत म्हटलं, "तुझे जोक्स जुने झाले आहेत." त्यावर प्रणित म्हणतो, "मी तुझ्यासारखा नाही, जो पाठीमागे बोलतो."
त्यानंतर अमाल त्याच्याजवळ जाऊन त्याला टच करतो त्यावर  प्रणित इशारा देतो, "मला हात लावू नकोस." पण अमाल पुन्हा स्पर्श करून म्हणतो, "तूही काही कर मग." या वादात झैशान कादरी मध्ये येऊन त्याला दूर खेचतो.
advertisement
ही पहिली वेळ नाही की अमलनं प्रणितला लक्ष्य केलं आहे. याआधी एका भागात त्यानं प्रणितला "झेब्रा" म्हणत वर्णद्वेषी टीका केली आहे. मराठी माणसाला बिग बॉसच्या घरात ज्याप्रकारची वागणूक मिळत आहे त्याविरोधात बाहेर प्रणितचे फॅन्स त्याच्या सपोर्टमध्ये उतरले आहेत.

प्रेक्षक आणि सेलिब्रिटींचा रोष

घरातील अमलच्या वागण्यावर अनेक प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. Bigg Boss 7 विजेती गौहर खाननं त्याच्या वागण्याला "घृणास्पद" म्हटलं. तिनं नॅशनल टेलिव्हिजनवर बोलताना काळजीपूर्वक शब्द वापरण्याचा सल्ला दिला.
advertisement
बिग बॉसच्या घरातील वाढता तणाव आणि सततच्या संघर्षामुळे येणारा वीकेंड का वार पाहण्यासारखा असणार आहे. सलमान खान घरातील कोणत्या सदस्याला फैलावर घेतो पाहणं इन्टेरेस्टिंग ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 : 'तू फ्लॉप कॉमेडीयन', मराठमोळ्या प्रणित मोरेला Bigg Boss 19च्या घरात नको नको ते बोलले; चाहते भडकले
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement