Elphinstone Bridge: एल्फिन्स्टन पूल प्रकल्पग्रस्तांपुढे सरकारने टेकले हात! देणार म्हाडाची घरं, लोकेशन काय?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Elphinstone Bridge: आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय एल्फिन्स्टन पुलाचं तोडकाम करू देणार नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली होती.
मुंबई: प्रभादेवी येथील ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्याचं पाडकाम सुरू आहे. या पुलाच्या जागी नवीन पूल बांधला जाणार आहे. या बांधकामात दोन इमारतींमधील रहिवाशांची घरं बाधित होणार आहेत. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकल्पबाधितांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या स्थितीत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या दोन इमारतींमधील 83 रहिवाशांना माटुंगा, दादर, प्रभादेवी, परळ आणि शिवडी येथील म्हाडाच्या घरांमध्ये जागा दिला जाणार आहे. वरळी ते शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पूल तोडून त्याच्याजागी नवीन डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. या पुलाचे खांब उभारण्यासाठी हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती पाडाव्या लागणार आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत 60 तर हाजी नुरानी या इमारतीत 23 रहिवासी आहेत. त्यामुळे पुलाच्या कामाला त्यांनी जोरदार विरोध केला होता.
advertisement
आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय एल्फिन्स्टन पुलाचं तोडकाम करू देणार नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली होती. रहिवाशांच्या मागणीपुढे सरकारला हात टेकावे लागले आहेत. याच परिसरात उपलब्ध असलेल्या म्हाडाच्या घरांमध्ये बाधित रहिवाशांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन सरकारने दोन आठवड्यांपूर्वी दिलं होतं. त्यानुसार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील या परिसरात उपलब्ध असलेल्या 119 घरांची यादी एमएमआरडीएला दिली आहे. त्यापैकी एमएमआरडीए पुनर्वसनासाठी 83 घरांची निवड करणार आहे.
advertisement
रहिवाशांना घरांचे वाटप करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर असणार आहे. आता रहिवासी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे. कारण, म्हाडाची ही घरं विखुरलेली असून 350 ते 650 चौरस फुटांची आहेत. यातील बरीचशी घरे चार ते पाच वर्षांपासून बंद असल्यामुळे त्यांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. या घरांसाठी म्हाडा रेडीरेकनरच्या 110 टक्के दराने एमएमआरडीएकडून पैशांची मागणी करणार आहे. यातून म्हाडाच्या तिजोरीत 100 कोटींहून अधिक महसूल जमा होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 10:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Elphinstone Bridge: एल्फिन्स्टन पूल प्रकल्पग्रस्तांपुढे सरकारने टेकले हात! देणार म्हाडाची घरं, लोकेशन काय?