PM Surya Ghar: पुणेकरांचं वीजबिल शून्य रुपये! 18,694 घरांना फायदा, कसं झालं शक्य?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
PM Surya Ghar: पंतप्रधान सूर्यघर योजना फायद्याची ठरत आहे. या योजनेमुळे पुण्यातील 18 हजार 694 जणांचं वीजबिल शून्य रुपये झालं आहे.
पुणे: देशभरात पंतप्रधान सूर्यघर योजना सुरू करण्यात आली असून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण देशात या योजनेतून 5 हजार 889 मेगावॅट एवढी क्षमता आत्तापर्यंत विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्र तब्बल 2 लाख 91 हजार 811 घरांवर सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात 1100 मेगावॅट पर्यंत सौरऊर्जेची क्षमता पोहोचली आहे. पुणे शहरात देखील या योजनेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेक पुणेकरांनी आपलं वीजबिल शून्य केलं आहे.
पुण्यातील 18 हजार 694 नागरिकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. पुण्यात या योजनेतून 90.62 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यामुळे अनेक कुटुंबांची वीजबिल भरण्याची चिंता मिटली आहे. आत्तापर्यंत 31649 घरगुती ग्राहकांनी या योजनेसाठी नावनोंदणी केली आहे. यापैकी 18 हजार 694 घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत. तर 7 हजार 397 घरांवरील काम शेवटच्या टप्प्यात आहे.
advertisement
अनुदानाचे स्वरूप कसे आहे?
ज्या ग्राहकांचा महिन्याचा वीजवापर 300 युनि च्या जवळपास आहे, त्यांच्यासाठी 3 किलोवाट क्षमता असलेला सूर्यघर प्रकल्प आहे. यामधून जवळपास 300 ते 360 युनिट वीज महिन्याला तयार होते. पहिल्या दोन किलो वॅटपर्यंत प्रति किलोवॅट 30 हजार तर तीन किलो वॅट प्रकल्पाला 78 हजाराचे अनुदान केंद्र सरकारकडून ग्राहकांना मिळते.
advertisement
पुणेकरांना अनुदान किती मिळाले?
पुणे महावितरण परिमंडळात गणेशखिंड मंडळात 7 हजार 312, पुणे ग्रामीण 5146 व रस्तापेठ मंडलात 6236 प्रकल्प कार्यरत झाले आहेत. गणेशखिंड मंडलात 62.4 कोटी, पुणे ग्रामीण 36.4 कोटी आणि रास्तापेठ 52.58 कोटी असे एकूण 151 कोटींचे अनुदान पुणे मंडलात आत्तापर्यंत मिळाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 25, 2025 10:24 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
PM Surya Ghar: पुणेकरांचं वीजबिल शून्य रुपये! 18,694 घरांना फायदा, कसं झालं शक्य?