Weather Alert: मराठवाड्यात पावसाचं तुफान, 72 तास महत्त्वाचे, गुरुवारी 5 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पुन्हा मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
1/5
मराठवाड्यात गेल्या काही काळात पावसानं कहर केला आहे. आज, 25 सप्टेंबर रोजी देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. गुरुवारी पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

advertisement
2/5
छत्रपती संभाजी नगरमध्ये आज आकाश साधारणपणे ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. आज पावसाचा जोर काहीसा कमी राहणार असला तरी शुक्रवारपासून पुन्हा जोरदार पावसाचा यलो अलर्ट असणार आहे.

3/5
बीड आणि जालना जिल्ह्यांना देखील आज कोणताही सतर्कतेचा इशारा नाही. परंतु, या ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून पुन्हा या जिल्ह्यांत धो धो पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

4/5
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती गंभीर झाल्याचे चित्र आहे. धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

5/5
दरम्यान, पुढील काही दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. शुक्रवारपासून 2-3 दिवस मराठाड्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून सर्व जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच पूरस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे लागेल.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement