Bigg Boss 19 : चौथ्या आठवड्यात प्रणित मोरे होणार घराबाहेर? नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा ट्विस्ट

Last Updated:

Bigg Boss 19 : या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रिया खूपच वेगळी होती. या प्रक्रियेनंतर काही खूपच धक्कादायक नावं नॉमिनेट झाली आहेत.

Bigg Boss 19 Elimination
Bigg Boss 19 Elimination
मुंबई : ‘बिग बॉस १९’ मध्ये प्रत्येक आठवड्यात नवा ड्रामा आणि नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या आठवड्यातही ‘वीकेंड का वार’मध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकप्रिय सोशल मीडिया स्टार्स असलेल्या नतालिया आणि नगमा मिराजकरला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दोघीही कमी वोटिंगमुळे घराबाहेर गेल्या, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

5 स्पर्धकांवर नॉमिनेशनची तलवार!

या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रिया खूपच वेगळी होती. घरामध्ये अभिषेक बजाज आणि शहबाज बदेशा यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यावरून, दोघेही नॉमिनेट झाल्याच्या चर्चा होत्या, पण शहबाजचं नाव नॉमिनेशन लिस्टमध्ये नव्हतं. सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा ‘बिग बॉस’ने सगळ्यांना असेंब्ली रूमध्ये बोलावून घेतलं. त्यांनी सांगितलं की, प्रत्येक स्पर्धकाने दोन-दोन जणांना नॉमिनेशनमधून वाचवायचं आहे. या प्रक्रियेनंतर काही खूपच धक्कादायक नावं नॉमिनेट झाली आहेत. या आठवड्यात नॉमिनेट झालेले ५ स्पर्धक आहेत - अभिषेक बजाज, अशनूर कौर, प्रणित मोरे, नेहल चुडासमा, बसीर अली.
advertisement
advertisement

प्रणित मोरेला बसणार फटका?

या यादीत काही अशी नावं आहेत, ज्यांना यंदाच्या पर्वात खूप मजबूत स्पर्धक मानलं जात आहे. आता हे ५ स्पर्धक धोक्यात आली आहेत. काही लोकांना नॉमिनेशनमध्ये अभिषेक बजाजचं नाव पाहूनही आश्चर्य वाटलं, कारण तो सतत चर्चेत असतो. अशातच हिंदी टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध नाव नॉमिनेशनमध्ये असल्याने आता याचा प्रणित मोरेला फटका बसू शकतो असेही अनेकांचं म्हणणं आहे. आता या ५ पैकी कोण बाहेर जाईल, हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 : चौथ्या आठवड्यात प्रणित मोरे होणार घराबाहेर? नॉमिनेशन टास्कमध्ये मोठा ट्विस्ट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement