'माझं कॅरेक्टर ढीलं...', साजिदने सांगितलं गौहर खानसोबत लग्न मोडण्याचं खरं कारण, म्हणाला 'मी प्रत्येक मुलीला...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sajid Khan Controversy : सध्या सोशल मीडियावर साजिदचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये साजिद खानने त्याच्या मोडलेल्या लग्नाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.
मुंबई : साजिद खान आणि फराह खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय भावंडांच्या जोडीपैकी एक आहे. दोघांनीही दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. अशातच साजिद खान आपल्या चित्रपटांपेक्षाही त्याच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आला आहे. अनेकदा त्याचे नाव कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या सोशल मीडियावर साजिदचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या मोडलेल्या लग्नाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.
साजिद खानने एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की बिग बॉस ७ ची विजेती आणि अभिनेत्री गौहर खान आणि तो रिलेशनशिपमध्ये होते. एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी साखरपुडाही केला होता. इतकंच नाही तर एका वृत्तसंस्थेने त्यांचा साखरपुडा कव्हरही केला होता. मग असं काय झालं की त्यांचा अचानक ब्रेकअप झाला. साजिद खानने याचं कारण सांगत स्वतःला यासाठी कारणीभूत ठरवले होते.
advertisement
साजिदने सांगितलं गौहर खानसोबत लग्न मोडण्याचं कारण
साजिद म्हणाला, गौहर खूपच चांगली मुलगी आहे. पण त्यावेळी माझं कॅरेक्टर चांगलं नव्हतं. मी तिला खोटं सांगून अनेक मुलींसोबत फिरायचो. मी काही चुकीचं काम केलं नाही, पण मी प्रत्येक मुलीला 'आय लव्ह यू, व्हील यू मॅरी मी?' म्हणायचो. त्यानुसार आतापर्यंत माझी ३५० लग्न व्हायला हवी होती, पण ती नाही झाली. मला खात्री आहे की, मी जितक्या मुलींसोबत होतो, त्यातल्या काही माझी अजूनही आठवण काढत असतील, तर काही मला शिव्या देत असतील.
advertisement
advertisement
दरम्यान, साजिदसोबतचं नातं तुटल्यानंतर गौहर खानने रिॲलिटी शोच्या दुनियेत नाव कमावलं. तिने बिगबॉस ७ शो जिंकला. या शोमध्ये ती कुशाल टंडनच्या प्रेमात पडली होती, मात्र शो संपल्यानंतर त्यांचं नातंही संपलं. २०२० साली गौहरने जैद दरबारशी लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझं कॅरेक्टर ढीलं...', साजिदने सांगितलं गौहर खानसोबत लग्न मोडण्याचं खरं कारण, म्हणाला 'मी प्रत्येक मुलीला...'