Rain Update: 'हा तो नव्हेच'! राज्यातील पावसाबाबत तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा, 2 ते 3 दिवस धोक्याचे

Last Updated:

Rain Update: मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. तर, मुंबई, कोकण, नाशिक आणि अहिल्यानगरला देखील पावसानं झोडपून काढलं आहे.

+
हा तो नव्हेच

'हा तो नव्हेच'! राज्यातील पावसाबाबत तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा, 2 ते 3 दिवस धोक्याचे

जालना: सध्या राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. तर, मुंबई, कोकण, नाशिक आणि अहिल्यानगरला देखील पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यात सुरू असलेला पाऊस नक्की परतीचा आहे का? या पावसाचा पॅटर्न कोणता आहे? या प्रश्नांची उत्तरं लोकल 18ने तज्ज्ञांकडून जाणून घेतली आहेत.
जालना कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्यात यावर्षी प्रचंड पाऊस पडला. जालना शहराच्या मागील 50 वर्षांच्या इतिहासात कधीही एवढा पाऊस झाला नव्हता. जालन्यात फक्त 3 तासांत 116.2 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यासह राज्यात होत असलेला पाऊस हा तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. आणखी 2 ते 3 दिवस या पावसाचा जोर राहील. यानंतर पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
पंडित वासरे म्हणाले, "सध्या राज्यात पडत असलेला पाऊस हा परतीचा नाही. 15 सप्टेंबरपासून राजस्थान येथून मान्सून माघारी फिरला आहे. पण, त्याचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. आयएमडीचा अहवाल बघता यावर्षी देखील याच कालावधीत मान्सून माघारी फिरेल."
advertisement
काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अचानक झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. लोकांच्या शेतात आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शकत्या असल्याने लोकांनी जीविताची काळजी घ्यावी. गोठ्यातील जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. शेतात साचलेलं अतिरिक्त पाणी काढून टाकावे आणि विद्युत तारांपासून सावध राहावे. विहिरीच्या आसपास फिरकू नये, असा सल्ला सुचना पंडित वासरे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rain Update: 'हा तो नव्हेच'! राज्यातील पावसाबाबत तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा, 2 ते 3 दिवस धोक्याचे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement