Dashavatar : सचिन पिळगांवकर तुम्हाला सिनिअर आहेत का? दिलीप प्रभावळकरांचं उत्तर ऐकून सगळेच शॉक

Last Updated:

Dashavatar Movie : दिलीप प्रभावळकर यांनी एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्याबद्दल खूपच खास गोष्ट सांगितली आहे.

News18
News18
मुंबई : गेल्या आठवड्यात मराठी चित्रपटसृष्टीत तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ यांचा समावेश आहे. पण, या सगळ्यांमध्ये दिलीप प्रभावळकर यांचा ‘दशावतार’ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलीप प्रभावळकर यांनी एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्याबद्दल एक खूपच खास गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.

‘हो, सचिन पिळगांवकर माझे सिनिअर!’

‘दशावतार’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलीप प्रभावळकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या अभिनय प्रवासावर भाष्य केलं. यावेळी त्यांना एक खूपच वेगळा प्रश्न विचारण्यात आला, “सचिन पिळगांवकर तुम्हाला सिनिअर आहेत का?” या प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांनी जे उत्तर दिलं, ते खूपच प्रामाणिक आणि नम्रहोतं. ते म्हणाले, “हो! सचिन पिळगांवकर मला सिनिअर आहेत.”
advertisement
Dashavatar : सिद्धार्थचं काम पाहून पत्नीला अश्रू अनावर, 'दशावतार' पाहिल्यावर अभिनेत्याला मिठी मारून ओक्साबोक्शी रडली बायको
त्यांनी याचं कारणही सांगितलं. ते म्हणाले, “मी खूप उशिरा काम करायला सुरुवात केली. मला या क्षेत्रात येऊन साधारण ५० वर्षे झाली आहेत. पण, सचिन पिळगांवकर यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून अगदी लहानपणापासूनचकाम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत ते माझ्यापेक्षा सिनिअरच आहेत.”
advertisement

बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'ने उडवला धुरळा

चित्रपट व्यापार विश्लेषक 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, 'दशावतार'ने पहिल्या दिवशी ५८ लाख रुपयांचा व्यवसाय केला. पण, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी, या कमाईने थेट कोटींचा टप्पा पार केला. चित्रपटाने १.३९ कोटी रुपये कमावले, ज्यामुळे फक्त दोन दिवसांतच जगभरात त्याची कमाई २.२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 'माऊथ पब्लिसिटी'मुळे 'दशावतार'ला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये हा चित्रपट अजून चांगली कमाई करेल असा अंदाज आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Dashavatar : सचिन पिळगांवकर तुम्हाला सिनिअर आहेत का? दिलीप प्रभावळकरांचं उत्तर ऐकून सगळेच शॉक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement