IND vs PAK : ड्रेसिंग रूमचा दरवाजा तोंडावर बंद केला, हॅण्डशेकही नाही, सूर्याने जगासमोर काढली पाकिस्तानची इज्जत
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. मॅच जिंकल्यानंतरही भारताने भर मैदानात पाकिस्तानची जगासमोर इज्जत काढली.
दुबई : आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. मॅच जिंकल्यानंतरही भारताने भर मैदानात पाकिस्तानची जगासमोर इज्जत काढली. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 47 रनची खेळी करून भारताला अगदी सहज विजय मिळवून दिला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसवेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याच्यासोबत हॅण्डशेकही केला नाही. तसंच सामना संपल्यानंतरही सूर्या मैदानात थांबला नाही.
टीम इंडियाने 15.5 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 131 रन केले, यानंतर सूर्या ताडबतोब ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि भारतीय खेळाडूंसोबत त्याने विजयाचं सेलिब्रेशन केलं. सूर्यकुमार यादव आतमध्ये आल्यानंतर भारतीय टीमने ड्रेसिंग रूमचं दारही लावून घेतलं. कोणत्याच भारतीय खेळाडूने पाकिस्तानी खेळाडूसोबत हस्तांदोलनही केलं नाही. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी अनेकांकडून केली जात होती, त्यामुळे या सामन्यावरून बराच वादही निर्माण झाला होता. अखेर हा सामना झाला आणि भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
advertisement
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर मॅचच्या पहिल्याच अधिकृत बॉलला पाकिस्तानची पहिली विकेट गेली. ओपनर सॅम अयुब पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. यानंतर पाकिस्तानला एकामागोमाग एक धक्के लागले. पाकिस्तानचा स्कोअर 100 रनपर्यंतही जाणार नाही, असं वाटत होतं. पण नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शाहिन आफ्रिदीने 16 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले, त्यामुळे पाकिस्तानला 127 रनपर्यंत मजल मारता आली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर बुमराह आणि अक्षर पटेलला 2-2 आणि हार्दिक पांड्या वरुण चक्रवर्तीला 1-1 विकेट मिळाली.
advertisement
टीम इंडिया सुपर-4 मध्ये
आशिया कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने आधी युएई आणि मग पाकिस्तानचा पराभव केला, त्यामुळे तिसरा सामना खेळण्याआधीच टीम इंडिया सुपर-4 मध्ये पोहोचली आहे. टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना ओमानविरुद्ध शुक्रवारी होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 12:06 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : ड्रेसिंग रूमचा दरवाजा तोंडावर बंद केला, हॅण्डशेकही नाही, सूर्याने जगासमोर काढली पाकिस्तानची इज्जत