Astrology: भयंकर होता वाईट दिवसांचा काळ! या 5 राशींचे आता पालटणार नशीब; दुहेरी लाभ मंगळ देणार
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 15, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
मेष (Aries) : आज सोमवारी आयुष्यात नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. प्रिय व्यक्तींसोबत अधिक वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. त्यामुळे रिलेशनशिप्समध्ये नव्याने सुसंवाद प्रस्थापित होईल आणि नात्यांमध्ये जवळीक तयार होईल. आरोग्याकडे जितकं लक्ष देणं शक्चय होईल, तितकं द्या. रूटीनमध्ये छोट्या सुधारणा करणं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायद्याचं ठरेल. आज आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी खोलवर विचार करा. आजच्या दिवसाचा चांगला उपयोग करा आणि नव्या प्लॅन्ससाठी तयार राहा. ग्रुप वर्कमध्ये सहभागामुळे सकारात्मक परिणाम मिळतील.
Lucky Number : 1
Lucky Color : Purple
Lucky Number : 1
Lucky Color : Purple
advertisement
वृषभ (Taurus) : सोमवारचा दिवस खूप सकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांमुळे तुमची ओळख निर्माण होईल, दखल घेतली जाईल. वैयक्तिक आयुष्यात प्रिय व्यक्तींसमवेत व्यतीत केलेला वेळ तुम्हाला आनंद देईल. कुटुंबीयांसमवेत संवादासाठी वेळ द्या. त्यामुळे नाती दृढ होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध होण्याची गरज आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या गोष्टी मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यास मदत करतील. आर्थिक बाबतींत गुंतवणूक काळजीपूर्वक करा. घाईगडबडीत निर्णय घेणं टाळा आणि स्वतःचा प्लॅन नीट समजून घ्या.
Lucky Number : 7
Lucky Color : Black
Lucky Number : 7
Lucky Color : Black
advertisement
मिथुन (Gemini) : सोमवारचा दिवस अनेक संधी घेऊन येणारा आहे. वेगळ्या विचारांमुळे आज नव्या कल्पनांचा उदय होईल. कामाच्या ठिकाणी टीमशी कोलॅबोरेशन करण्यावर लक्ष केंद्रित करा. आरोग्य चांगलं राहण्यासाठी हलका व्यायाम करा. वेळेच्या योग्य व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा. काही नवे प्लॅन्स तयार करण्याची संधी मिळेल. त्यातून भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्याची संधी मिळेल. तुमची क्लृप्ती आणि संवादकौशल्य यांमुळे आज तुम्हाला मोठी मदत होईल.
Lucky Number : 2
Lucky Color : Blue
Lucky Number : 2
Lucky Color : Blue
advertisement
कर्क (Cancer) : सोमवारचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि नव्या शक्यतांनी भरलेला असेल. कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत करणं मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या कष्टांना लवकरच फळं आलेली दिसतील. आज जुना प्रोजेक्ट पुन्हा सुरू करण्याचा विचार कराल. त्यातून तुम्हाला समाधान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस नॉर्मल असेल; मात्र स्वतःची काळजी घ्या. विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा. सर्जनशील कृतींमुळेही मानसिक शांतता मिळेल. तुमची संवेदनशीलता आणि सहानुभूती यांमुळे माणसं तुमच्याकडे आकर्षित होतील. सामाजिक कामांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे रिलेशनशिप्स मजबूत होतील. वेळेचा योग्य वापर करण्याला तुमचं प्राधान्य असेल. हेतू स्पष्ट राखा आणि पुढे चालत राहा.
Lucky Number : 8
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 8
Lucky Color : Dark Green
advertisement
सिंह (Leo) : आज सोमवारी आपणास नवी प्रेरणा मिळाल्यासारखं वाटेल. त्यामुळे उद्दिष्टाच्या दिशेने जाण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी कल्पनांचं कौतुक होईल आणि सहकाऱ्यांसोबत कोलॅबोरेशन करण्याची संधी मिळेल. तुमचे नातेसंबंध या वेळी दृढ होतील. प्रिय व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत केल्यामुळे मानसिक शांतता मिळेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगा. योगासनं, ध्यानधारणा केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारेल. आर्थिक बाबतींत विचारपूर्वक पावलं उचला, खासकरून मोठे खर्च करण्याच्या आधी... आज सर्जनशीलता उच्च पातळीवर असेल. त्यामुळे नव्या कलाविषयक प्रकल्पावर काम करण्याचा प्रयत्न करा. या वेळी पूर्ण आत्मविश्वास तुम्हाला शांतता आणि समाधान देईल.
Lucky Number : 11
Lucky Color : Pink
Lucky Number : 11
Lucky Color : Pink
advertisement
कन्या (Virgo) : सोमवारचा दिवस सकारात्मक विचारांचा असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद साधणं फायद्याचं ठरेल. कारण टीमवर्क अधिक चांगले रिझल्ट्स देईल. वैयक्तिक आयुष्यात कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत केल्यामुळे आनंद होईल. छोट्या तपशीलांकडे लक्ष दिल्यास रिलेशनशिप्समध्ये जवळीक वाढेल. योगासनं आणि व्यायाम करण्याचा काळ आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मिळेल. गरज नसताना चिंता आणि ताण यांपासून दूर राहा. गुंतवणूक शहाणपणाने करा. आज स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि पुढे चला. सकारात्मक विचाराने दिवसाचा आनंद घ्या.
Lucky Number : 3
Lucky Color : Sky Blue
Lucky Number : 3
Lucky Color : Sky Blue
advertisement
तूळ (Libra) : आज सोमवारी कामाच्या ठिकाणी प्रकल्पावर काम करत असलात, तर तुमच्या कष्टांची फळं मिळतील. थोडंसं थकल्यासारखं वाटेल. आध्यात्मिक पातळीवर ध्यानधारणा आणि आत्मपरीक्षण आज महत्त्वाचं असेल. त्यामुळे आज मानसिक शांतता लाभेल आणि अलीकडच्या अॅक्टिव्हिटीजमधून रिकव्हर होण्यास मदत होईल. तुमच्या भावना आणि परिस्थिती संतुलित ठेवणं आज महत्त्वाचं आहे. तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि आतल्या आवाजाचं ऐका.
Lucky Number : 9
Lucky Color : Green
Lucky Number : 9
Lucky Color : Green
advertisement
वृश्चिक (Scorpio) : आज सोमवारी सोशल लाइफमध्ये अॅक्टिव्हिटी असेल. त्यातून नवे संपर्क तयार होतील. कुटुंबीय, मित्रांसोबत वेळ व्यतीत केल्यामुळे आनंदी व्हाल. कामाच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतंही मोठं पाऊल उचलण्याआधी पूर्ण माहिती घ्या. संवादात स्पष्टता राखणं महत्त्वाचं आहे. थकल्यासारखं वाटेल. त्यामुळे विश्रांती घ्या. योगासनं, ध्यानधारणेचा रूटीनमध्ये समावेश करा. आजचा दिवस तुमची अंतःप्रेरणा आणि संवेदनशीलता वाढवील. त्याचे फायदे प्रत्येक क्षेत्रात मिळतील.
Lucky Number : 4
Lucky Color : Yellow
Lucky Number : 4
Lucky Color : Yellow
advertisement
धनू (Sagittarius) : आजचा दिवस सकारात्मकता आणि नव्या संधींचा असेल. आत्मविश्वासाने भरपूर असेल. मित्रमंडळींसोबत वेळ व्यतीत केल्यामुळे आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचं कौतुक होईल. नवा प्रकल्प सुरू करण्याचा विचार असेल, तर आजचा दिवस त्यासाठी अनुकूल आहे. आज ऊर्जावान वाटेल; मात्र थोडी विश्रांती घ्यायला विसरू नका. ध्यानधारणा, योगासनं यांमुळे मानसिक आरोग्य उत्तम होईल. आर्थिक बाबींमध्ये शहाणपणाने निर्णय घेणं गरजेचं आहे. मोठी गुंतवणूक करण्याआधी विचारपूर्वक पाऊल उचला. आजचा दिवस उत्साह आणि यशाचा आहे. सकारात्मकता कायम राखून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
Lucky Number : 10
Lucky Color : Red
Lucky Number : 10
Lucky Color : Red
advertisement
मकर (Capricorn) : सोमवारचा दिवस नवी ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न कराल, कष्ट यशस्वी होतील. संतुलित आहार घ्या. सेल्फ-केअरसाठी चांगला काळ आहे. नवीन प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. क्रिएटिव्हिटी कल्पनांना आकार देईल. आर्थिक स्थिती चांगली असू शकेल; मात्र खर्चांवर नियंत्रण हवं. प्रोफेशनल लाइफमध्ये इतरांसोबत राहण्यात यशस्वी व्हाल. सकारात्मक विचार करा आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. मानसिक ताणापासून दूर राहण्याची गरज आहे. आजचा दिवस नव्या शक्यता आणील. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
Lucky Number : 5
Lucky Color : Maroon
Lucky Number : 5
Lucky Color : Maroon
advertisement
कुंभ (Aquarius) : सोमवार खूप सकारात्मक दिवस असेल. आज कल्पनांमध्ये नावीन्य आणि ताजेपणा असेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. वैयक्तिक नातेसंबंधांत सुधारणा असेल. कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्यासोबत वेळ व्यतीत करा. त्यातून मनःशांती मिळेल. नवी गुंतवणूक करण्याची कल्पना मनात येईल; पण निर्णय घेण्यापूर्वी चांगला विचार करा. विचार, भावना मोकळेपणाने व्यक्त करा. त्यामुळे नातेसंबंध दृढ होतील. क्रिएटिव्हिटी आणि सोशल रिलेशनशिप्स मजबूत करण्यासाठी या वेळेचा उपयोग करा. ऊर्जेचा सकारात्मक दिशा द्या. त्यामुळे योग्य रिझल्ट्स मिळतील.
Lucky Number : 12
Lucky Color : Orange
Lucky Number : 12
Lucky Color : Orange
advertisement
मीन (Pisces) : सोमवार कामासाठी अत्यंत अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ व्यतीत केल्यास मानसिक शांतता मिळेल. कल्पनाशक्ती उच्च पातळीवर असेल. त्यामुळे तिचा कामात किंवा सर्जनशील प्रकल्पांमध्ये उपयोग करा. नव्या प्लॅनचा विचार करत असलात, तर त्यांना आकार देण्यासाठी योग्य काळ आहे. बिझनेसमध्ये सावध राहा. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टी तपासून पाहा. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित करा. या दिवसाचा चांगला वापर करा आणि ऊर्जेला सकारात्मक दिशा द्या. स्व-विकास आणि नव्या शक्यता आजमावण्याचा हा काळ आहे.
Lucky Number : 6
Lucky Color : White
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Lucky Number : 6
Lucky Color : White
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)