'बुमराहला 6 बॉल 6 सिक्स मारणार', मॅचआधी डिंग्या हाकल्या, मैदानात तोंडावर आपटला पाकिस्तानी खेळाडू

Last Updated:

IND vs PAK Asia Cup आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा लाजिरवाणी कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 127 रन करता आल्या.

'बुमराहला 6 बॉल 6 सिक्स मारणार', मॅचआधी डिंग्या हाकल्या, मैदानात तोंडावर आपटला पाकिस्तानी खेळाडू
'बुमराहला 6 बॉल 6 सिक्स मारणार', मॅचआधी डिंग्या हाकल्या, मैदानात तोंडावर आपटला पाकिस्तानी खेळाडू
दुबई : आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा लाजिरवाणी कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 127 रन करता आल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर बुमराह-अक्षर पटेलला 2-2 आणि हार्दिक पांड्या-वरुण चक्रवर्तीला 1-1 विकेट मिळाली. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 40 रन केले तर नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या शाहिन आफ्रिदीने 16 बॉलमध्ये नाबाद 33 रनची खेळी केली.
मॅचच्या पहिल्याच अधिकृत बॉलला टीम इंडियाला विकेट मिळाली. मॅचचा पहिला बॉल वाईड टाकल्यानंतर हार्दिक पांड्याने सॅम अयुबला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पॉईंटच्या दिशेने हवेत शॉट मारल्यानंतर बुमराहने सॅम अयुबचा कॅच पकडला. सॅम अयुब आशिया कपमध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा गोल्डन डकवर आऊट झाला आहे. याआधी ओमानविरुद्धच्या सामन्यातही सॅम अयुब पहिल्या बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता. ओमानच्या शाह फैजलने सॅम अयुबला एलबीडब्ल्यू केलं होतं.
advertisement

6 बॉल 6 सिक्स मारणार

या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर तनवीर अहमद याने सॅम अयुबबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. सॅम अयुब जसप्रीत बुमराहला 6 बॉल 6 सिक्स मारेल, असं तनवीर अहमद म्हणाला होता, यावरून तनवीर अहमदला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलही करण्यात आलं होतं. मैदानात मात्र सॅम अयुब दोन्ही सामन्यांमध्ये एकही रन न करता आऊट झाला.
advertisement
सॅम अयुबने 2024 साली पाकिस्तानकडून पदार्पण केलं, यानंतर त्याला 41 पैकी 39 सामन्यांमध्ये बॅटिंगची संधी मिळाली. यात त्याने 22.10 ची सरासरी आणि 136.4 च्या स्ट्राईक रेटने 816 रन केल्या आहेत. नाबाद 98 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. तसंच त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 करिअरमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतकं केली आहेत.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'बुमराहला 6 बॉल 6 सिक्स मारणार', मॅचआधी डिंग्या हाकल्या, मैदानात तोंडावर आपटला पाकिस्तानी खेळाडू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement