Marathwada Mukti Sangram: 1947 नंतर 13 महिन्यांनी मराठवाडा झाला स्वतंत्र, MIM पक्ष होता व्हिलन!
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Marathwada Mukti Sangram: 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा प्रदेश निजामांच्या तावडीतून मुक्त झाला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती संग्राम' दिन म्हणून साजरा केला जातो.
भारताला ब्रिटिशांच्या ताब्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. मात्र, काही भाग असूनही स्थानिक शासकांच्या अधिपत्याखाली होता. तत्कालीन हैदराबाद संस्थानाचा (मराठवाड्याचा काही भाग) देखील यात समावेश होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा प्रदेश निजामांच्या तावडीतून मुक्त झाला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती संग्राम' दिन म्हणून साजरा केला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कासिमला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. ही बाब निजामाने हेरली. आपल्याविरुद्ध सुरू असलेलं जनआंदोलन चिरडण्यासाठी आपल्याला एमआयएमचा उपयोग होईल, हे निजामाच्या लक्षात आलं. त्याने कासिम रझवीला बळ देण्यास सुरुवात केली. या बाळाचा गैरवापर करत कासिम रझवीने शेवटच्या टप्प्यामध्ये एक रझाकार संघटना उभी केली.
advertisement
advertisement
तेव्हाचा एमआयएम पक्ष आणि सध्याच्या एमआयएमच्या नावामध्येच फरक आहे. 'मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' हे तत्कालीन नाव होतं. सध्याच्या एमआयएमचं नाव 'ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' हे नाव आहे. आजही एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहणाला येत नाहीत, अशी माहिती अभ्यासक सारंग टाकळकर यांनी दिली.