Dharashiv: तुळजाई कला केंद्राबाबत पोलिसांचा मोठा निर्णय, धाराशिवचं प्रशासन ताळ्यावर

Last Updated:

Dharashiv News: तुळजाई कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. त्याच कला केंद्राच्या परवान्यासंबंधीचा अहवाल धाराशिवच्या वाशी पोलिसांनी मोठा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.

तुळजाई कला केंद्र
तुळजाई कला केंद्र
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : बीडच्या गेवराई तालुक्यातील उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. अखेर पोलिसांनी कला केंद्राचा परवाना रद्द करण्यासंबंधी अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात केंद्रबिंदू ठरलेल्या कलाकेंद्राचा परवाना रद्द करण्याचा पोलिसांनी अहवाल दिला आहे. कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली ती याच कला केंद्रात नर्तिकेचे काम करीत होती. नियम धाब्यावर बसवून कला केंद्रात काम चालायचे, अशा तक्रारी प्रशासनाकडे वारंवार होत होत्या. मात्र प्रशासनाने तक्रारींकडे कानाडोळा केला. परंतु बर्गे प्रकरणाची धग संपूर्ण जिल्हाभरात असल्याने पोलिसांनी तत्काळ परवाना रद्द करीत असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला.
advertisement

अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे, छमछम बंद होणार? निर्णयाकडे लक्ष

धाराशिवच्या वाशी पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवला होता. यापूर्वी तहसीलदारांनी परवाना रद्द केल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी परवाना रद्द करण्याला स्थगिती दिली होती. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दाखवल्यानंतर प्रशासन ताळ्यावर आले. पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व घटनाक्रमाचा अहवाल देत कला केंद्र बंद करण्याची शिफारस केली आहे. आता धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजाई कला केंद्राच्या परवान्याबाबत काय निर्णय घेणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
advertisement

उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरण

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृत्यू डोक्यात गोळी लागून झाल्याचे वृत्त आल्यानंतर बीडसह धाराशिव जिल्ह्यात खळबळ माजली. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता धाराशिव जिल्ह्यातील तुळजाई कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेम संबंधांचा उलगडा झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील संबंध ताणलेले असल्याने गोविंद मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने डोक्यात गोळी मारून जीवन संपवल्याचे पोलीस चौकशीत समोर आले.
advertisement

...तर पुढे मागे न पाहता कारवाई करा, पालकमंत्री सरनाईक यांच्या प्रशासनाला सूचना

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचीही कला केंद्र प्रकरणाला धरून महसूल आणि पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा झाली. अनधिकृत असेल तर पुढे मागे न पाहता कारवाई करा, अशा सूचना
प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिल्या.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dharashiv: तुळजाई कला केंद्राबाबत पोलिसांचा मोठा निर्णय, धाराशिवचं प्रशासन ताळ्यावर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement