advertisement

बेस्टफ्रेंडच्या लग्नात नाच-नाच नाचली, मग तिच्याच नवऱ्याला पळवलं! लग्नाच्या 3 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा Divorce

Last Updated:

Hansika Motwani Divorce: हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी घटस्फोट घेत असल्याची बातमी समोर आली आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडमध्ये जितक्या वेगाने नाती जुळतात, तितक्याच वेगाने ती तुटतातही. नुकतंच इंडस्ट्रीतून अतिशय शॉकिंग बातमी समोर आली आहे. हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी घटस्फोट घेत असल्याची बातमी समोर आली आहे. पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून तिचा पती सोहेल कथुरियाने तिला प्रपोज केलं होतं. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या ३ वर्षांतच त्यांचा संसार मोडला असून ही बातमी ऐकताच चाहत्यांना धक्का बसला आहे.

मैत्रिणीच्या नवऱ्याशीच केलेलं लग्न

हंसिका आणि सोहेल त्यांच्या लग्नापासूनच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले होते. कारण हंसिकाची जवळची मैत्रीण रिकी बजाजशी सोहेलचं पहिलं लग्न झालं होतं. विशेष म्हणजे, या लग्नात हंसिकाने धमाल केली होती आणि नवरीची बेस्टफ्रेंड म्हणून तोराही मिरवला होता. जेव्हा सोहेल आणि हंसिकाच्या लग्नाची माहिती समोर आली, तेव्हा नेटकऱ्यांनी हंसिकावर मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. मात्र हंसिकाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. 'हंसिका लव शादी ड्रामा' या वेब सीरिजमधून आपली बाजू मांडली होती. आता हंसिकाच्या घटस्फोटाची बातमी समोर येताच या वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे.
advertisement

का होतोय हंसिका-सोहेलचा घटस्फोट?

हंसिकाचे वकील अदनान शेख यांनी या घटस्फोटामागची काही महत्त्वाची कारणं स्पष्ट केली आहेत. त्यांच्या मते, लग्नानंतर काही काळातच हंसिका आणि सोहेलला हे कळलं होतं की त्यांचे विचार आणि जीवनशैली एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी आहे. रोजच्या छोट्या-छोट्या भांडणांमुळे त्यांना एका छताखाली राहणं कठीण झालं होतं. त्यातच दोघांचंही बीझी शेड्यूल आणि प्रोफेशनल लाइफ यामुळे त्यांच्यातील संवाद पूर्णपणे बंद झाला होता. अखेर, दोघांनीही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हंसिकाने सोहेलकडून कोणत्याही प्रकारची पोटगी किंवा संपत्तीची मागणी केलेली नाही.
advertisement

'शाका लाका बूम बूम' ते साऊथची सुपरस्टार

हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात 'शाका लाका बूम बूम', 'सोनपरी' आणि 'कोई... मिल गया' यांसारख्या सुपरहिट मालिका आणि चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून केली होती. पुढे जाऊन तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बेस्टफ्रेंडच्या लग्नात नाच-नाच नाचली, मग तिच्याच नवऱ्याला पळवलं! लग्नाच्या 3 वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्रीचा Divorce
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement