Book Exhibition: मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकाने पाहावा असा दुर्मिळ खजिना, छ. संभाजीनगरात भव्य प्रदर्शन
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Book Exhibition: भारत स्वतंत्र झाल्याच्या 13 महिन्यानंतर म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. मात्र, जेव्हा देशात स्वातंत्र्याची रणधुमाळी सुरू होती तेव्हा परिस्थिती वेगळी होती. सध्याचा मराठवाडा हा प्रदेश हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा सुद्धा मराठवाड्यातील जनता निजामाचे अत्याचार सहन करत होती. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं आहे. भारत स्वतंत्र झाल्याच्या 13 महिन्यानंतर म्हणजेच 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा जाज्वल्य इतिहास येणाऱ्या पिढीला कळवा, यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विशेष पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील 'सरस्वती भुवन महाविद्यालया'मध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित अगदी पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या ठिकाणी तत्कालीन मराठवाडा दैनिकाचे दुर्मिळ अंक देखील ठेवण्यात आले आहे. मराठवाड्यामधील नागरिकांनी आपल्या जुलमी निजामाविरोधात कसा संघर्ष केला, याची माहिती आणि वर्णन असलेली पुस्तकं या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहेत. काही दुर्मिळ पुस्तकांचा देखील यामध्ये समावेश आहेत. काही वृत्तपत्रांचे 1948 पासूनचे अंकसुद्धा या प्रदर्शनांमध्ये मांडण्यात आले आहेत.
advertisement
प्राचार्य डॉक्टर विवेक मिरगणे म्हणाले, "आपल्या येणाऱ्या पिढीला आपला इतिहास कळवा यासाठी दरवर्षीप्रमाणे मी यंदाही पुस्तक प्रदर्शन भरवलं आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी हे प्रदर्शन बघू शकतात. त्यांना एखादं पुस्तक आवडल्यास तर त्यांना ग्रंथालयामधून ते वाचण्यासाठी देखील मिळेल. विद्यार्थ्यांप्रमाणे सामान्य नागरिकांसाठी देखील हे पुस्तक प्रदर्शन खुले असणार आहे. त्यामुळे सर्वांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी."
advertisement
17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला होता. तेव्हापासून दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर सरस्वती भुवन महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकरलं जाणार नाही.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 16, 2025 4:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Book Exhibition: मराठवाड्यातील प्रत्येक नागरिकाने पाहावा असा दुर्मिळ खजिना, छ. संभाजीनगरात भव्य प्रदर्शन