'ती विवाहित पुरुषांसोबत...' वडिलांच्या EX गर्लफ्रेंडवर संतापला कुमार सानूचा मुलगा, VIDEO व्हायरल

Last Updated:

सलमान खानचा सुपरहिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' सध्या भरपूर गाजतोय. या सीझनमध्ये वाद, नाट्य, भांडणं आणि रोमान्स सगळं काही पाहायला मिळतंय.

वडिलांच्या EX गर्लफ्रेंडवर संतापला कुमार सानूचा मुलगा
वडिलांच्या EX गर्लफ्रेंडवर संतापला कुमार सानूचा मुलगा
मुंबई : सलमान खानचा सुपरहिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' सध्या भरपूर गाजतोय. या सीझनमध्ये वाद, नाट्य, भांडणं आणि रोमान्स सगळं काही पाहायला मिळतंय. पण यावेळी सर्वात जास्त चर्चेत आहे शोमधील सर्वात ज्येष्ठ स्पर्धक अभिनेत्री कुनिका सदानंद. अशातच अभिनेत्रीचे एक्स कुमार सानूच्या लेकाने तिच्यावर निशाणा साधला आहे.
कुनिका बिग बॉसच्या घरात असताना तिची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत तिने बॉलिवूडबद्दल केलेलं विधान ऐकून चाहते थक्क झाले आहेत.
कुनिका म्हणाली होती "बॉलिवूडमध्ये बलात्कार होत नाहीत. अभिनेत्री स्वतः अशा काही इशारे देतात, जे निर्माता-दिग्दर्शक समजून घेतात." तिने उदाहरण देताना सांगितलं होतं,“जर एखादी अभिनेत्री दिग्दर्शकाच्या परफ्यूमची प्रशंसा करते, तर तो तिला म्हणतो, जवळ येऊन वास घे.” हे विधान ऐकून सोशल मीडियावर खळबळ माजली. लोकांनी तिच्यावर टीका सुरू केली.
advertisement
सगळ्यात धक्कादायक म्हणजे गायक कुमार सानू यांचा मुलगा, जान कुमार सानू यांनी थेट तिला भिडत प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं, “तिने स्वतः तिच्या करिअरमध्ये हे केलंय, तेही विवाहित पुरुषांसोबत. खूप बोलू नकोस, नाहीतर तुझी अनेक गुपितं बाहेर येतील.” या विधानानंतर प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आलंय. कारण काही वर्षांपूर्वी कुनिका आणि कुमार सानू यांचं नावही एकत्र जोडलं गेलं होतं. ते जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, असं म्हटलं जातं.
advertisement












View this post on Instagram























A post shared by kylie (@kylie.coree)



advertisement
दरम्यान, मात्र, त्याच मुलाखतीत कुनिकाने स्वतः स्पष्ट केलं होतं की तिने "कामासाठी कधीही तडजोड केली नाही. मी एका विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडले होते, पण कामासाठी कोणाशीही कॉम्प्रमाइज केलं नाही."
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ती विवाहित पुरुषांसोबत...' वडिलांच्या EX गर्लफ्रेंडवर संतापला कुमार सानूचा मुलगा, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement