भार्गवचा नमस्कार अन् किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO चर्चेत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shahrukh Khan - bhargav jagtap Video : राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान आणि बालकलाकार भार्गव जगताप यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
मुंबई : नुकताच 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील एका व्हिडीओनं मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तो व्हिडीओ आहे शाहरुख खान आणि बालकलाकार भार्गव जगताप यांचा. शाहरुख खानचा प्रेमळ स्वभाव यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हा व्हिडीओ पाहून शाहरुखचं कौतुक होतं.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याला सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर नाळ या मराठी चित्रपटातील बालकलाकार भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं.
दरम्यान पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान आपलं अवॉर्ड घेऊन आपल्या जागेवर परतत येत असताना भार्गव जगतापने त्याचं अभिनंदन केलं. भार्गवने शाहरुखकडे हात पुढे केला. शाहरुखने देखील त्याच्याशी हात मिळवला दोघांनी हँडशेक केला. भार्गव शाहरुख खानच्या पाया पडला. त्यानंतर शाहरुखने भार्गवला मिठी मारली. आपल्या मुलाप्रमाणे त्याच्या खांद्यावर विश्वासानं हात ठेवला आणि त्यालाही शुभेच्छा दिल्या.
advertisement
हा क्षण प्रेक्षकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. एका बाजूला हिंदी सिनेसृष्टीचा सुपरस्टार शाहरुख खान आणि दुसऱ्या बाजूला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला मराठी बालकलाकार. .या दोघांची ही भेट खूप काही सांगून गेली.
शाहरुखच्या या कृतीचं सगळेच कौतुक करत आहेत. भार्गव देखील शाहरुखला ज्याप्रकारे भेटला त्यासाठी त्याचंही अभिनंदन केलं जातंय. व्हिजीओ पाहून अनेकांनी कमेंट करत शाहरुखचं कौतुक केलंय. एकानं लिहिलंय, हम्बल किंग. दुसऱ्यानं लिहिलंय, हेच कारण आहे त्यामुळेच तो किंग खान आहे.
advertisement
advertisement
भार्गव बद्दल बोलायचं झाल्यास भार्गवीने नाळ या सिनेमात उत्तम काम केलं आहे. त्याला त्याच्या भुमिकेसाठी यंदाचा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. नाळ सिनेमातील तिनही बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिलाला. भार्गवीसह त्रिशा ठोसर आणि श्रीनिवास पोकळे यांनीही राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 8:18 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भार्गवचा नमस्कार अन् किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO चर्चेत