कधी पाहिलाय का सोनेरी केसांचा वटवागूळ? भारतात 'या' ठिकाणी आढळला दुर्मीळ जीव
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एका अनोख्या शोधामुळे आता भारतात पहिल्यांदाच एक दुर्मीळ प्रकारचा गोल्डन केस असलेला आणि ट्यूबसारखा नाक असलेला वटवागूळ आढळून आला आहे.
मुंबई : निसर्गाच्या अद्भुत दुनियेत काही जीव त्यांच्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे आणि दुर्मीळ अस्तित्वामुळे नेहमीच संशोधकांना आकर्षित करतात. विशेषतः, जीवसृष्टीतील जैवविविधतेचा अभ्यास करताना वेळोवेळी नवनवीन प्रजाती सापडत असतात. अशाच एका अनोख्या शोधामुळे आता भारतात पहिल्यांदाच एक दुर्मीळ प्रकारचा गोल्डन केस असलेला आणि ट्यूबसारखा नाक असलेला वटवागूळ आढळून आला आहे.
भारतीय प्राणी सर्वेक्षण (ZSI) मधील वैज्ञानिकांनी मिजोरममध्ये सोनेरी केस असलेला आणि नळीसारखी नाकरचना असलेला वटवाघूळ शोधला आहे. या दुर्मिळ प्रजातीला भारतात पहिल्यांदाच पाहिले गेले आहे. मिजोरममधील आयझोल जिल्ह्यातील हमयूफांग गावाच्या जंगलात डॉ. उत्तम सैकिया यांनी वटवाघुळांच्या सर्वेक्षणादरम्यान ही प्रजाती नोंदवली.
या शोधाचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉ. सैकिया यांनी हंगेरियन नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे डॉ. गॅबोर सेसोरबा, जिनेव्हा नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे डॉ. मॅन्युएल रुएदी आणि नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशनचे डॉ. रोहित चक्रवर्ती यांच्यासोबत काम केले.
advertisement
जुन्या नमुन्यांचा आणि डीएनएचा अभ्यास
विदेशातील संग्रहालयांतील नमुने आणि मिजोरममधील नमुना यांचा डीएनए विश्लेषण केल्यानंतर, या वटवाघुळाची ओळख हार्पियोला आइसोडॉन या प्रजातीमध्ये करण्यात आली. यापूर्वी लुंगलेई जिल्ह्यातील सैरेप गावातून मिळालेल्या जुन्या नमुन्याचाही अभ्यास करून हेच निष्कर्ष काढण्यात आले.
सोनेरी केस आणि नळीसारखी नाक असलेले हे वटवाघूळ प्रथम 2006 मध्ये तैवानमध्ये आढळले होते. त्यानंतर दक्षिण चीन आणि व्हिएतनाममध्येही ते नोंदवले गेले. संशोधकांच्या मते ही प्रजाती डोंगराळ जंगलांमध्ये आढळते आणि लाओस, कंबोडिया, थायलंड तसेच म्यानमारमध्येही तिची उपस्थिती असू शकते.
advertisement
फक्त 32 ते 36 मिमी हातांचा आकार असलेले हे छोटे वटवाघूळ आपल्या सोनेरी केसांमुळे आणि अनोख्या नाकामुळे सहज ओळखले जाते. डॉ. सैकिया आणि त्यांची टीम गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ भारतीय हिमालयीन पट्ट्यातील वटवाघुळांच्या अभ्यासात गुंतलेली आहे आणि त्यांनी अनेक नव्या प्रजातींचा शोध नोंदवला आहे.
जेडएसआयच्या संचालिका डॉ. धृति बॅनर्जी यांनी सांगितले की, ही शोधमोहीम ईशान्य भारतात आणखी केंद्रित संशोधन करण्याची गरज अधोरेखित करते. हा प्रदेश दोन जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट्समध्ये समाविष्ट असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. या शोधानंतर आता भारतामध्ये वटवाघुळांच्या एकूण 136 प्रजातींची नोंद झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2025 8:44 PM IST