अपघाताच्या बातम्यांना वेग येताच काजलने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, “ही पूर्णपणे निराधार आणि खोटी बातमी आहे. देवाच्या कृपेने मी सुरक्षित, निरोगी आहे आणि माझ्या कामात व्यस्त आहे. कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
'मुलांचा इगो...' यशस्वी लग्नासाठी सोहा अली खानला आई शर्मिला टागोरचा सल्ला, म्हणाल्या...
advertisement
कामाच्या व्यस्त वेळापत्रकात काजल तिच्या पती गौतम किचलूसोबत थोडा रिलॅक्स होण्यासाठी मालदीवला गेली होती. तिथल्या सुंदर फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. काजलने सांगितलं की मालदीव हे तिच्या फेव्हरेट डेस्टिनेशनपैकी एक असून, तिला तिथे पुन्हा पुन्हा जायला आवडेल.
दरम्यान, आता तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: द इंट्रोडक्शन’मध्ये काजल मंदोदरीची भूमिका साकारत आहे, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भव्य प्रोजेक्टसोबतच ती ‘द इंडिया स्टोरी’, ‘इंडियन 3’ आणि ‘रामायण: पार्ट 2’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.