TRENDING:

Guess Who : कपूर खानदानाचा लाडका, जो हिरो नाही तर व्हिलन बनून झाला प्रसिद्ध, लुक्समध्ये राज, शम्मी आणि शशीपेक्षा नव्हता कमी

Last Updated:

Kapoor Star : कपूर खानदानातील एका कलाकाराने हिरो म्हणून नाही तर व्हिलन म्हणून प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. कपूर खानदानाचा हा कलाकार लुक्समध्येही कमी नव्हता आणि व्यक्तिमत्त्वातही नाही. तरीसुद्धा त्याने हिरोऐवजी खलनायकाच्या भूमिका केल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kapoor Star : कपूर खानदानातील एका कलाकाराने हिरो म्हणून नाही तर व्हिलन म्हणून प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. कपूर खानदानाचा हा कलाकार लुक्समध्येही कमी नव्हता आणि व्यक्तिमत्त्वातही नाही. तरीसुद्धा त्याने हिरोऐवजी खलनायकाच्या भूमिका केल्या.
News18
News18
advertisement

Kapoor Star : कपूर खानदान हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि जुनं कुटुंब मानले जातं. या कुटुंबाने इंडस्ट्रीला अनेक मोठे कलाकार दिले आहेत. पृथ्वीराज कपूर, राज कपूरपासून ते ऋषी कपूर आणि रणबीर कपूरपर्यंत या कुटुंबातील अनेक कलाकारांनी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली आहे. कपूर कुटुंबाचा उल्लेख झाला की देखणे चेहरे डोळ्यांसमोर येतात, ज्यांनी मुख्य नायक-नायिकांच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. पण तुम्हाला या प्रसिद्ध खानदानातील त्या कलाकाराबद्दल माहिती आहे का, ज्यांनी हिरो नव्हे तर खलनायक म्हणून आपली ओळख निर्माण केली? लुक्समध्ये ते कपूर कुटुंबातील कोणत्याही सदस्यापेक्षा कमी नव्हते आणि अभिनयातही नाही. आपण बोलत आहोत कमल कपूर यांच्याबद्दल, जे व्हिलन म्हणून प्रसिद्ध झाले.

advertisement

व्हिलन बनून प्रसिद्ध झालेले कमल कपूर

कमल कपूर हे देखील कपूर खानदानातीलच सदस्य होते. त्यांचे वडील बशेश्वरनाथ कपूर होते, जे पेशावरमध्ये इम्पीरियल पोलिसमध्ये अधिकारी होते. कमल कपूर आणि पृथ्वीराज कपूर हे मामेभाऊ होते. दोघांची आई एकमेकिंची बहिण आणि पृथ्वीराज कपूर यांनीच कमल कपूर यांना चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यास मदत केली होती. त्यांनी त्यांना आपल्या पृथ्वी थिएटरमध्ये संधी दिली. या नात्यामुळे कमल कपूर हे राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांचे काका ठरले. जिथे कपूर खानदानातील इतर सदस्य हिरो बनून ओळख निर्माण करत होते, तिथे कमल कपूर यांनी खलनायक म्हणून वेगळी ओळख मिळवली आणि त्या काळातील सर्वात मोठ्या व्हिलनपैकी एक बनले.

advertisement

500 हून अधिक चित्रपटांत काम

कमल कपूर यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आपल्या करिअरमध्ये 500 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले. त्यांनी फक्त हिंदीच नव्हे तर पंजाबी आणि गुजराती चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या खलनायकांपैकी एक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. कमल कपूर यांनी इंडस्ट्रीत खूप नाव कमावले. त्यांच्या यशामुळे त्यांच्या मुलगा कपिल यानेही इंडस्ट्रीत ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश मिळाले नाही आणि निराशा पदरी पडली.

advertisement

या चित्रपटांत साकारल्या खलनायकाच्या भूमिका

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

कमल कपूर यांनी साकारलेल्या काही लक्षात राहणाऱ्या भूमिकांबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन अभिनीत ‘डॉन’ (1978) मधील नारंग ही त्यांची अत्यंत गाजलेली भूमिका होती. याशिवाय ‘मर्द’ चित्रपटातील जनरल डायरच्या भूमिकेमुळेही ते चांगलेच चर्चेत आले. ‘पाकीजा’, ‘दीवार’ आणि ‘खेल खेल में’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांना थक्क केले.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : कपूर खानदानाचा लाडका, जो हिरो नाही तर व्हिलन बनून झाला प्रसिद्ध, लुक्समध्ये राज, शम्मी आणि शशीपेक्षा नव्हता कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल