पुस्तक विक्रेता ते मिस्टर गे इंडिया
विशाल हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातला असून व्यवसायाने ग्रंथ प्रकाशक आणि पुस्तक विक्रेता आहे. त्याने मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशन आणि क्वीरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या 'मिस्टर गे इंडिया 2023' स्पर्धेत सहभाग घेतला होता. मला माझ्या कुटुंबाकडून विशेषत माझी बहिण आणि छोटी पुतणी यांच्याकडून यासाठी खूप प्रोत्साहन मिळालं, असं विशाल सांगतो.
advertisement
आदिवासी महिलांच्या कलाकृतींचा जगभर डंका, 'बांबू लेडी'नं कशी केली किमया? Video
समाजात अवमानकारक वागणूक
समाजात लैंगिक भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जातो. लैंगिक अल्पसंख्याक म्हणजेच समलिंगी अथवा तृतीयपंथी लोकांकडे तुच्छतेने पाहिलं जातं. अनेकदा कुटुंबीय, आप्तस्वकीय, मित्रमंडळी पाठिंबा देत नाहीत. भावनिक आधाराचा अभाव, अवमानकारक वागणूक, आमच्यावरील अत्याचार, बलात्कार, खून अशा अनेक समस्या आहेत. आम्हाला सन्मान मिळावा, द्वेषभावना वाट्याला येऊ नये, यासाठी काम करत आहे. आता दक्षिण आफ्रिकेतील 'मिस्टर गे वर्ल्ड' साठी तयारी करत आहे. असं विशाल सांगतो.
कशी झाली स्पर्धा?
या स्पर्धेत विविध राज्यातून 20 स्पर्धक सहभागी झाले होते. विविध फेर्या यशस्वी होत विशाल आणि केरळचा अभिषेक अंतिम फेरीत दाखल झाले. दोघांनीही उत्तम सादरीकरण करत आपली सामाजिक जाणीव आणि समज दाखवली. एकमेकांना चुरस दिली. यामध्ये विशालने बाजी मारत मिस्टर गे इंडिया 2023 चा किताब जिंकला. यासह विशालला 'मिस्टर गे महाराष्ट्र' व अभिषेक याला 'मिस्टर गे केरळा' किताब देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूरकरांनी गाजवलं कर्नाटक, चित्तथरारक मोटार स्पर्धेत रचला इतिहास
स्पर्धकांनी जिंकली मनं
एलजीबीटीक्यू समुदायाला सक्षम करण्यासाठी, सन्मानाने जगण्याची संधी देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. हे पॅजेंट सकारात्मक बदल घडवून जगण्यातील अडथळे दूर करेल. या तुच्छतेने पाहिल्या जाणार्या समुदायाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. देशाच्या विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी आपली पार्श्वभूमी, अनुभव, आजवरचा प्रवास, प्रेरणा, अनेकांकडून मिळालेली मौल्यवान साथ, समुदायाला सन्मान देण्यासाठी जागृती करण्याचा विचार मांडत परीक्षक आणि उपस्थितांची मने जिंकली, असं आयोजकांनी म्हटलंय.





