TRENDING:

नोव्हेंबर महिन्यात मोडलं लग्न, 3 महिन्यांनी पलाश मुच्छलचा मोठा निर्णय! सोशल मीडियावर 'तो' PHOTO VIRAL

Last Updated:

Palaash Muchhal News: स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर 'द शो मस्ट गो ऑन!' म्हणत आता पलाश मुच्छलने जुन्या जखमा विसरून पुन्हा एकदा आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून संगीतकार पलाश मुच्छाल हे त्याच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळेच जास्त चर्चेत होते. भारतीय महिला क्रिकेटची स्टार प्लेअर स्मृती मानधना आणि पलाश यांचं ठरलेलं लग्न ऐनवेळी मोडलं आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. फसवणुकीचे आरोप, हॉस्पिटलमधील ड्रामा आणि चाहत्यांची नाराजी... या सगळ्यात पलाश मुच्छाल पुरता अडकला होता. पण म्हणतात ना, 'द शो मस्ट गो ऑन!' आता पलाशने जुन्या जखमा विसरून पुन्हा एकदा आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे.
News18
News18
advertisement

महाशिवरात्रीचा मुहूर्त अन् थ्रिलरची घोषणा

पलाश मुच्छलने त्याचा संगीताचा पेशा बाजूला सारून दिग्दर्शनाची कमान हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, आपल्या नवीन चित्रपटासाठी त्याने मराठमोळा सुपरस्टार श्रेयस तळपदे आणि बॉलीवूड सुंदरी डेझी शाह यांची तगडी जोडी मैदानात उतरवली आहे.

'कुठेही गाठून काम मागायचे...', बड्या डायरेक्टरने सांगितलं नाना पाटेकरांना 20 वर्ष काम न देण्याचं कारण

advertisement

नेहमीच रोमँटिक गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा पलाश आता प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणण्यासाठी सज्ज झाला आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पलाशने आपल्या आगामी थ्रिलर चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. अद्याप या सिनेमाचं नाव गुलदस्त्यात असलं, तरी श्रेयस तळपदे यामध्ये एका साध्या माणसाची आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, लवकरच मुंबईत या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे.

advertisement

3 वर्षांचं रिलेशनशिप अन् लग्नाच्याआधीच मोडलं नातं

पलाश आणि स्मृती मानधना यांचं नातं जगजाहीर होतं. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगलीत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र, लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची आणि पलाशची तब्येत बिघडल्याचं सांगत लग्न पुढे ढकलण्यात आलं. पण त्यानंतर जे काही घडलं, त्याने सर्वांनाच धक्का दिला. पलाशवर फसवणुकीचे आरोप झाले आणि अखेर या जोडीने त्यांचं लग्न मोडल्याचं जाहीर केलं. या ब्रेकअपच्या धक्क्यातून सावरल्यानंतर पलाशचा हा पहिलाच मोठा प्रोजेक्ट आहे.

advertisement

डेझी शाह आणि श्रेयसची फ्रेश केमिस्ट्री

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

श्रेयस तळपदे आपल्या सहज अभिनयासाठी ओळखला जातो, तर डेझी शाहने 'जय हो'पासून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोघांना एकत्र पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल. पलाशने या चित्रपटात मुंबईच्या गजबजलेल्या आयुष्यातील एक रहस्यमयी गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्मृतीसोबतच्या वादात पलाशची प्रतिमा मलीन झाली असली, तरी तो आपल्या कामाने पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
नोव्हेंबर महिन्यात मोडलं लग्न, 3 महिन्यांनी पलाश मुच्छलचा मोठा निर्णय! सोशल मीडियावर 'तो' PHOTO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल