TRENDING:

Mirzapur the Film येतेय, राजस्थानमध्ये शूटिंग करताना दिसला अली फजल, 'गुड्डू भैय्या'चा BTS व्हिडीओ व्हायरल

Last Updated:

Mirzapur the Film : 'मिर्झापूर द फिल्म' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या फिल्मच्या शूटिंगला आता राजस्थानमध्ये सुरुवात झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mirzapur The Film : 'मिर्झापूर' ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सीरिज चांगलीच गाजली. या सुपरहिट सीरिजच्या सर्व सीझनचे सर्व एपिसोड प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. 'मिर्झापूर : द फिल्म'ची घोषणा होताच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक क्राइम-थ्रिलर फ्रँचायझी आता OTT वरून थेट मोठ्या पडद्यावर येणार आहे. अॅमेझॉन MGM स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या फिल्मची निर्मिती होत आहे. 'मिर्झापूर द फिल्म' ही भव्यदिव्य सिनेमॅटिक फिल्म असणार आहे. हा सिनेमा 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
News18
News18
advertisement

मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गुड्डू भैय्या म्हणजेच अली फजल यांनी राजस्थान शेड्यूलमधील एक खास BTS व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अली फजल सेटवर येताना दिसतोय आणि त्याचा तोच दमदार, रफ-टफ गुड्डू भैय्याचा अंदाज पाहून चाहते अधिकच आतुरतेने आता या फिल्मची प्रतीक्षा करत आहेत.

advertisement

अली फजलने व्हिडीओ शेअर करत राजस्थानमधील लोकांसाठी एक मनाला भिडणारं कॅप्शनदेखील शेअर केलं आहे. जैसलमेर आणि जोधपूरमध्ये शूटिंगदरम्यान मिळालेलं प्रेम आणि आपुलकीबद्दल त्याने तेथील लोकांचे आभार मानले. राजस्थानमध्ये त्याला घरापासून दूर असूनही घरासारखं समाधान मिळाल्याचं त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. तिथल्या हॉटेल्स आणि टीमच्या आदरातिथ्याचंही त्यांने भरभरून कौतुक केलं.

advertisement

अली फजली पोस्ट काय?

अली फजलने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"मिर्झापूर : द फिल्म'ची शूटिंग सध्या जोरात सुरू आहे आणि आम्ही राजस्थानमध्ये या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करत आहोत. जैसलमेर आणि जोधपूरकरांचे मनापासून

अली फजल यांनी पोस्टमध्ये लिहिलं,"मिर्झापूर: द फिल्म'ची शूटिंग सध्या जोरात सुरू आहे आणि आम्ही राजस्थान शेड्यूलमध्ये आहोत. जैसलमेर आणि जोधपूरकरांचे मनापासून आभार. त्यांच्याकडून आम्हाला खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली आहे. खम्मागणी! और सबसे भी मिलाना है आपको| पुरी पलटन खेल रही है|". या BTS व्हिडिओमुळे मिर्झापूर: द फिल्मबाबत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

advertisement

प्रेक्षक पुन्हा एकदा 'मिर्झापूर'मधील पात्रांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत. विशेषतः मुन्ना भैय्याच्या पुनरागमनाबाबत प्रचंड चर्चा आणि उत्साह पाहायला मिळत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मकर संक्रांतीसाठी घेवर आणि फेनी, जालन्यात अतिशय प्रसिद्ध पदार्थ, इथं भरतंय बाजार
सर्व पहा

'मिर्झापूर: द फिल्म'चे दिग्दर्शन गुरमीत सिंह करत आहेत. चित्रपटात पंकज त्रिपाठी (कालीन भैय्या), अली फजल (गुड्डू पंडित), दिव्येंदु (मुन्ना त्रिपाठी) आणि अभिषेक बनर्जी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 2026 मध्ये सिनेमागृहांत प्रदर्शित होईल आणि त्यानंतर सुमारे आठ आठवड्यांनी भारतासह 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाईल. मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी ही खरंच एक मोठी ट्रीट ठरणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Mirzapur the Film येतेय, राजस्थानमध्ये शूटिंग करताना दिसला अली फजल, 'गुड्डू भैय्या'चा BTS व्हिडीओ व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल