काही दिवसांपूर्वीच 'भूत बंगला' या चित्रपटाची घोषणा झाली असून अक्षय कुमार आणि तब्बू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील इतर कलाकारांबाबत बोलायचं झालं तर परेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठमोळ्या अभिनेत्रीची या चित्रपटात वर्णी लागली आहे.
advertisement
मोहम्मद सिराज 'बिग बॉस 13' फेम अभिनेत्रीला करतोय डेट? कुठून पसरली अफवा? अखेर ती गोष्ट समोर आलीच
पिंकव्हिलाच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, लिटिल थिंग्स वेबसीरिज फेम अभिनेत्री मिथिला पालकर अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' या चित्रपटात दिसणार असून ती अक्षय कुमारच्या बहिणीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग मार्च २०२५ मध्ये संपण्याची शक्यता आहे. दरम्यान या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार मिथिला २५ दिवसांसाठी चित्रपटाचं शूट करणार आहे. प्रियदर्शन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने आतापर्यंत हेरा फेरी, भूल भुलैया, गरम मसाला, भागम भाग आणि खट्टा मीठा यांसारखे चित्रपट दिले आहेत. यामुळेच यावेळीही या जोडीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
रिपोर्टनुसार, "भूत बंगला अतिशय भव्य पद्धतीने तयार केला जात आहे. प्रियदर्शन यांंना त्यात विनोद आणि थ्रिलसह हॉरर घटकांचा समतोल साधायचा आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, परेश रावल, राजपाल यादव आणि असरानी सारख्या कलाकारांची अतुलनीय केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे."
