advertisement

मोहम्मद सिराज 'बिग बॉस 13' फेम अभिनेत्रीला करतोय डेट? कुठून पसरली अफवा? अखेर ती गोष्ट समोर आलीच

Last Updated:

Mohammed Siraj-Mahira Sharma : एका लोकप्रिय हिंदी मालिका अभिनेत्रीसोबत मोहम्मद सिराजचे नाव जोडले जात आहे.

एका लोकप्रिय हिंदी मालिका अभिनेत्रीसोबत मोहम्मद सिराजचे नाव जोडले जात आहे.
एका लोकप्रिय हिंदी मालिका अभिनेत्रीसोबत मोहम्मद सिराजचे नाव जोडले जात आहे.
Mohammed Siraj-Mahira Sharma Dating Rumours : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा खेळाडू त्याच्या खेळामुळे नाही, तर त्याच्या डेटिंग लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद सिराजचे नाव ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेशी जोडले जात होते. मात्र या दोघांनीही एकमेकांना भाऊ-बहीण म्हणत या प्रकरणावर पडदा टाकला. आता हे प्रकरण शांत होत नाही तोच एका लोकप्रिय हिंदी मालिका अभिनेत्रीसोबत सिराजचे नाव जोडले जात आहे.
बिगबॉस १३ फेम अभिनेत्री माहिरा शर्मा हिंदी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २८ वर्षीय अभिनेत्रीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. याआधी तिचे नाव बिग बॉस १३ मधील स्पर्धक पारस छाबडासोबत जोडले गेले होते. मात्र चार वर्षांनी दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र या अफवा कुठून सुरू झाल्या हे तुम्हाला माहित आहे का?
advertisement
मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाहीत. अशातच सिराजने माहिराचा एक फोटो लाईक केला होता. या एका लाईकने त्यांच्या डेटिंगच्या अफवांना हवा दिली. सध्या हा विषय हॉट टॉपिक बनला आहे. दरम्यान, ते दोघे एकमेकांना खरंच डेट करत आहेत का याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
advertisement
या प्रकरणी माहिरा शर्माच्या आईने प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ही अफवा फेटाळून लावली आहे. मिडियाशी बोलताना त्या म्हणाल्या, “लोक काहीही बोलतात. माझी मुलगी सेलिब्रिटी आहे, तर तिचे नाव कोणासोबतही जोडले जाते. तर प्रत्येक गोष्ट खरी मानायची का?” माहिरा शर्माच्या आईने या अफवा खोट्या असल्याचे सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मोहम्मद सिराज 'बिग बॉस 13' फेम अभिनेत्रीला करतोय डेट? कुठून पसरली अफवा? अखेर ती गोष्ट समोर आलीच
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement