80च्या दशकात दिली श्रीदेवी-माधुरीला टक्कर, करिअर पीकवर असताना सोडली इंडस्ट्री, आता अभिनेत्री करतेय 'हे' काम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rupini Mahuvakar: बाल कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास पूर्ण केलेली ही अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीतलं मोठं नाव होती.
८० च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी हेमा मालिनी, रेखा, जयललिता, जया बच्चन यांची जागा घेण्याचा प्रयत्न केला. श्रीदेवी, जया प्रदा आणि माधुरी यांनी या काळात सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांच्या बरोबरच एका अशा अभिनेत्रीनेही या इंडस्ट्रीत प्रवेश केला जी कालांतराने तिच्या अभिनय कौशल्यामुळे कमी वेळातच हिट अभिनेत्री बनली.
बाल कलाकार ते अभिनेत्री असा प्रवास पूर्ण केलेली ही अभिनेत्री मराठी इंडस्ट्रीतलं मोठं नाव होती. तिने हिंदी सिनेमांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र करिअर पीकवर असतानाच अभिनेत्रीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री आहे कोमल महुवाकर, जिला रूपिनी या नावानेही ओळखलं जायचं. ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'मिली' या चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. यानंतर काही चित्रपट केल्यावर तिने 'पायल की झंकार' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली.
advertisement
ऋषि कपूरसोबत ती 'मेरी अदालत' या चित्रपटात दिसली होती. यानंतर तिची लोकप्रियता वाढली. तिने तिच्या करिअरमध्ये हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये काम केले. तिच्या समोर श्रीदेवी, माधुरी दीक्षित, जया प्रदाही फिक्या पडत होत्या. मग असं काय झालं की अचानक या अभिनेत्रीने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला?
advertisement
१९९५ मध्ये कोमलने मोहन कुमारशी लग्न करून तिच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले. यासाठी तिने तिचं करिअर सोडलं. हातातील प्रोजेक्ट्स पूर्ण करून ती मुंबईतील चेंबूर येथे स्थायिक झाली. तिला अनिशा नावाची एक मुलगी आहे. काही वर्षांनी कोमलने चेंबूर येथे एक रुग्णालय सुरू केले, ज्याचं नाव आहे युनिव्हर्सल हार्ट हॉस्पिटल.
advertisement
कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देऊन कोमलने पुन्हा एकदा पुनरागमन केले. 'वो रहें वाली महलों की' या टीव्ही शोमध्ये ती शीतलच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी तिने 'चिट्टी 2' से मधून पुनरागमन केले. पण हा चित्रपट डायरेक्ट टीव्हीवर प्रदर्शित झाल्यामुळे चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर पाहता आले नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2025 7:31 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
80च्या दशकात दिली श्रीदेवी-माधुरीला टक्कर, करिअर पीकवर असताना सोडली इंडस्ट्री, आता अभिनेत्री करतेय 'हे' काम









