Khushi Kapoor : 'लोकांना वाटतं प्लास्टिक...', नोज जॉब आणि लिप फिलर्सवर खुशी कपूर स्पष्टच बोलली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Khushi Kapoor Cosmetic Surgery : अभिनेत्री खुशी कपूरला तिने केलेल्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियांवरून अनेकदा ट्रोल केले जाते. आता अभिनेत्रीने याबाबत मौन सोडले आहे.
Khushi Kapoor Cosmetic Surgery : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'लव्हयापा'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये ती आमीर खानचा मुलगा जुनैद खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, अभिनेत्री खुशी कपूरला तिने केलेल्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियांवरून अनेकदा ट्रोल केले जाते. आता अभिनेत्रीने याबाबत मौन सोडले आहे.
खुशीने नोज जॉब आणि लिप फिलर यासारख्या कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. खुशीने सांगितले की, तिला लहानपणापासूनच सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायला आवडतं. तिला नेहमी चर्चेत राहायचे होते. जेव्हा तिला कॉस्मेटिक सर्जरी करण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की ही काही मोठी गोष्ट नाही. लोकांना हे खूप अपमानास्पद वाटते. पण तिला त्याची पर्वा नाही. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी लोक तिच्याबद्दल नकारात्मक बोलायचे.
advertisement
Curly Tales ला दिलेल्या मुलाखतीत खुशी कपूर म्हणाली, “मला वाटत नाही की यात काही मोठी गोष्ट आहे. लोक अनेकदा प्लास्टिक सर्जरी करतात… लोकांना वाटते की प्लास्टिक सर्जरी करणे चुकीचे आहे. मी इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच, मी कशी आहे आणि मी कोण आहे याबद्दल लोकांची धारणा आधीच तयार झाली होती... त्यापैकी बहुतेक नकारात्मक विचार होते."
advertisement
advertisement
वास्तविक, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये खुशी कपूरने एक जुना व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिची आई श्रीदेवीसोबत एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे. खुशी तेव्हा खूप लहान होती. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. एका यूजरने लिहिले की, “खुशी पूर्वीसारखीच दिसते. असे दिसते की तिने खरोखर वजन कमी केले आहे."
advertisement
खुशी कपूरच्या या व्हिडिओवर आणखी एका युजरने लिहिले होते, “ती १२ वर्षांची होती. तिने काही वर्षांआधीच तिने ब्रेसेस लावले होते. तिने फक्त लिप फिलर्स करून घेतले आहे इतकंच.” खुशीने या कमेंट्सना उत्तर दिले होते, “केवळ लिप फिलर आणि नोज फिलर (नोज इमोजी) केले गेले आहेत. हाहाहा." प्लास्टिक सर्जरीची वस्तुस्थिती तिने आनंदाने स्वीकारली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2025 1:48 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Khushi Kapoor : 'लोकांना वाटतं प्लास्टिक...', नोज जॉब आणि लिप फिलर्सवर खुशी कपूर स्पष्टच बोलली










