advertisement

Mumbai Metro: मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार, मेट्रो 9 आणि 2B येणार सेवेत, नवीन तारीख आली समोर

Last Updated:

मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या दोन मार्गिकांच्या लोकार्पणाची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. वारंवार पुढे ढकलल्या गेलेल्या या प्रकल्पांसाठी आता 7 एप्रिल ही नवी तारीख निश्चित करण्यात आली असून मंगळवारपासून दोन्ही मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या होणार आहेत.

मुंबईला मोठा दिलासा : मेट्रो 2B आणि मेट्रो 9 7 एप्रिलपासून सेवेत.
मुंबईला मोठा दिलासा : मेट्रो 2B आणि मेट्रो 9 7 एप्रिलपासून सेवेत.
मुंबई : मुंबईच्या वाढत्या वाहतूक कोंडीला दिलासा देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या दोन मार्गिकांच्या लोकार्पणाची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. वारंवार पुढे ढकलल्या गेलेल्या या प्रकल्पांसाठी आता 7 एप्रिल ही नवी तारीख निश्चित करण्यात आली असून मंगळवारपासून दोन्ही मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
मंडाळे ते डी. एन. नगर आणि दहिसर ते मीरा भाईंदर या मार्गिकांचे काम पूर्ण होऊनही उद्घाटनात विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. मेट्रो 2B च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन सुमारे 5 महिने झाले आहेत तर मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्यालाही सुमारे 2.5 महिने उलटले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सर्व तयारी पूर्ण केली असतानाही राज्य सरकारच्या वेळापत्रकातील बदल आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्घाटन वारंवार पुढे ढकलण्यात आले.
advertisement
यापूर्वी 3 एप्रिल आणि 6 एप्रिल अशा दोन वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र अखेर 7 एप्रिल रोजी लोकार्पण निश्चित झाले आहे. या दिवशी केवळ मेट्रोच नव्हे तर ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या भुयारीकरणाचा शुभारंभ आणि बीकेसीतील पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही होणार आहे.
पहिल्या टप्प्यात मेट्रो 9 दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव या स्थानकांदरम्यान धावणार आहे. तर मेट्रो 2B मंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन या स्थानकांदरम्यान सेवा देणार आहे. या नव्या सेवेमुळे मुंबईतील प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार, मेट्रो 9 आणि 2B येणार सेवेत, नवीन तारीख आली समोर
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement