कमालच आहे! रस्ता वाढवण्याऐवजी पालिकेने चक्क केला अजब कारभार; खारघरकरांचा संताप
Last Updated:
Kharghar Road : खारघर सेक्टर 7 मध्ये रस्त्याबाबत एक अजब कारभार केल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. पनवेल महापालिकेच्या या निर्णयावर नागरिक आणि स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून चुकीच्या नियोजनाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
पनवेल : नागरी विकासाच्या नावाखाली बऱ्याच वेळा असे निर्णय घेण्यात येतात,जे प्रत्यक्षात नागरिकांच्या अडचणी वाढवतात. नवी मुंबई परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरु असून लोकसंख्या या परिसरात वाढत आहे. त्यामुळे त्या भागातील रस्ते रुंद करणे अपेक्षित असताना पनवेल महापालिकेने थेट उलटचा निर्णय घेतल्याचा प्रकार नुकताच समोर आलेला आहे.
नेमकं काय घडलं?
खारघरच्या सेक्टर 7 मधील परिसरात असलेल्या हिरानंदानी भागासमोरचा रस्ता वाढवण्याच्या जागी तो रस्ता कमी करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आधी या ठिकाणी वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी पुरेसा मोकळा रस्ता उपलब्ध होता. पण आता गार्डनर तसेच फुटपाथ तयार करण्याच्या नावाखाली रस्त्याच्या महत्त्वाचा आणि मोठा भाग कमी करण्यात आलेला आहे.
advertisement
या प्रकारामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी वाढली असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे शिवाय तेथून पायी जाणाऱ्या नागरिकांच्याही सुरक्षेला धोका निर्माण होतोय. खास करुन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने यांसारख्या आपक्तालीन वाहनांना मार्ग मिळण्यात अडचणी येत आहे. त्यामुळेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय रस्त्याचे काम करण्याबाबत कोणते नियोजन करण्यात आले होती आणि नेमकी गरज काय होती असे अनेक प्रश्न नागरिकांकडून गेले जात आहेत.
advertisement
अशातच या समस्येवर एका पक्षाच्या पदाधिकारी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महापालिका प्रशासनाला या कामांबाबत पूर्णपणे स्पष्टीकर देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते तो रस्ता कमी करण्याऐवजी शहरातील अन्य समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील अनेक ठिकाणी खराब रस्ते, ड्रेनेजच्या अडचणी आणि पाठीपुरवठ्याबाबतचे प्रश्न आहे. त्या गोष्टी साठी निधी खर्च होणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 8:57 AM IST









