सोहा म्हणाली, "आई-बाबांचं लग्न इतक्या वर्ष टिकून राहिलं, हेच माझ्यासाठी मोठं धडे आहेत. आजच्या काळात इतक्या पर्यायांमुळे नाती टिकवणं अवघड झालं आहे. पण त्यांनी ते करून दाखवलं."
राजेश खन्नांचा बोल्ड सिनेमा, फक्त 9 थिएटरमध्ये झाला प्रदर्शित; केलेला कोट्यवधींचा गल्ला
सोहाने सांगितलं की तिच्या आईकडून तिला आजही एक साधा पण महत्त्वाचा सल्ला मिळतो. "पुरुषाचा अहंकार आणि स्त्रीच्या भावना दुखवू नका." हा सल्ला जुना वाटला तरी आजच्या नात्यांमध्ये तो तितकाच उपयुक्त आहे, असं सोहाचं म्हणणं आहे.
advertisement
शर्मिला टागोर आणि पतौडी यांचं लग्न 1968 मध्ये झालं. त्यावेळी शर्मिला केवळ 24 वर्षांच्या होत्या. धर्मभिन्न विवाहामुळे समाजातून आणि राजकीय गटांकडून विरोध झाला. धमक्या दिल्या गेल्या. तरीही शर्मिलाने धर्म स्वीकारून नाव बदलून आयेशा सुलतान ठेवलं. लग्नानंतर आणि मुलं झाल्यानंतरही शर्मिलाने अभिनय सुरू ठेवला. त्या काळात नायिका लग्नानंतर पडद्यावर दिसत नसत, पण शर्मिलाने हे बंधन मोडलं. क्रिकेटपटू पतौडींचं उत्पन्न फारसं जास्त नसल्याने, काही काळ कुटुंबाच्या खर्चाचा मोठा भाग शर्मिलाने उचलला होता.
शर्मिला–पतौडी यांनी तीन मुलं. सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान. दोघांचं वैवाहिक जीवन तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ टिकून राहिलं. पतौडींच्या निधनानंतरही शर्मिला एकट्याच आयुष्य जगत आहेत.