काही दिवसांपूर्वी मंत्री प्रताप सरनाईकांनी त्यांच्या नातवासाठी टेस्ला ही महागडी इलेक्ट्रिक कार विकत घेतली होती, ज्यामुळे खूप चर्चा झाली. याच कारवरून आस्ताद काळेने त्यांना काही बोचरे प्रश्न विचारले आहेत. आस्तादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “त्या नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA रुपी खेळण्याची किंमत किती आहे हो काका? आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, कर भरणाऱ्या, तरीही खड्ड्यांमधून आमच्या कष्टाच्या पैशांतून घेतलेली वाहनं चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो काका?”
advertisement
“उत्तराची अपेक्षा नाही, पण प्रश्न विचारत राहायचं!”
आस्तादने पुढे दोन थेट प्रश्न विचारले: १. एवढा पैसा आला कुठून, काका? २. तुमच्या लाडक्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावरून न्यायला सांगा ना. बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता.”
या पोस्टला त्याने “उत्तरं नसतीलच… आपण प्रश्न विचारत राहायचं…” असं कॅप्शन दिलं आहे. आस्तादच्या या निडर भूमिकेचं अनेकांनी कमेंट करून कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं, “बरोबर कार्यक्रम केलास!” तर दुसऱ्याने म्हटलं, “हीच तर शोकांतिका आहे! उत्तरं मिळणार नाहीत, कारण आता वॉशिंग मशीन सोबत आहे.” याआधीही आस्तादने अनेकदा रस्त्यांच्या समस्यांवर आवाज उठवला आहे, पण अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.