TRENDING:

शाहरुख खानमुळे संजय दत्तचा 'मुन्नाभाई 3' बनू शकला नाही? अर्शद वारसीचा धक्कादायक खुलासा

Last Updated:

'मुन्नाभाई चले अमेरिका' हा 'मुन्नाभाई' सिरिजचा तिसरा पार्ट येणार होता. त्याची घोषणा झाली, टीझर देखील आला पण तो सिनेमा कधीच रिलिज झाला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी इतिहास रचला. 'मुन्ना भाई' आणि 'सर्किट' ही जोडी त्यापैकीच एक. राजकुमार हिराणी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने संजय दत्तच्या बुडत्या करिअरला सावरलं आणि अर्शद वारसीला घराघरात ओळख मिळवून दिली. पण, गेल्या अनेक वर्षांपासून चाहते ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत, तो म्हणजे 'मुन्नाभाई ३' कधी येणार?
मुन्नाभाईच्या तिसऱ्या पार्टबद्दल अर्शद वारसीचा खुलासा
मुन्नाभाईच्या तिसऱ्या पार्टबद्दल अर्शद वारसीचा खुलासा
advertisement

'मुन्नाभाई चले अमेरिका' हा 'मुन्नाभाई' सिरिजचा तिसरा पार्ट येणार होता. त्याची घोषणा झाली, टीझर देखील आला पण तो सिनेमा कधीच रिलिज झाला नाही. पण अनेकांच्या मनात याबद्दल अनेक प्रश्न आहेत, ज्याचं उत्तर 'लल्लनटॉप'ला दिलेल्या एका मुलाखतीत अर्शद वारसीने दिलं आहे. ज्याचा संबंध थेट 'बॉलिवूडचा किंग' शाहरुख खानशी जोडला गेला आह

advertisement

नेमकं कारण काय? शाहरुखचा कोणता सिनेमा आडवा आला?

अर्शद वारसीच्या म्हणण्यानुसार, 'मुन्नाभाई' फ्रँचायझीचा तिसरा भाग 'मुन्नाभाई चले अमेरिका' (Munna Bhai Chale America) या नावाखाली बनणार होता. मात्र, हा चित्रपट अचानक रेंगाळण्याचं मुख्य कारण ठरला शाहरुख खानचा 'माय नेम इज खान' (My Name Is Khan) हा चित्रपट.

अर्शदने स्पष्ट केलं की, "'मुन्नाभाई चले अमेरिका'ची कथा 'माय नेम इज खान'शी बऱ्यापैकी मिळतीजुळती होती. त्या चित्रपटातही मुन्ना आणि सर्किट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी जाणार होते. राजकुमार हिराणींना त्यांचा चित्रपट दुसऱ्या कोणत्याही चित्रपटासारखा वाटलेला अजिबात आवडत नाही. त्यामुळे जेव्हा त्यांना ही साम्यं लक्षात आली, तेव्हा त्यांनी तो प्रोजेक्ट थांबवण्याचा निर्णय घेतला."

advertisement

राजकुमार हिराणींचा तो स्वभाव आणि 'PK'चा किस्सा

हिराणी हे त्यांच्या ओरिजनॅलिटीसाठी ओळखले जातात. अर्शदने सांगितले की, हिराणी किती शिस्तप्रिय आहेत. "जेव्हा त्यांना 'ओह माय गॉड' (OMG) या चित्रपटाबद्दल कळाले, तेव्हा त्यांनी त्यांच्या 'पीके' (PK) चित्रपटाचा सेकंड हाफ चक्क तीन वेळा लिहिला होता," असे अर्शदने आवर्जून नमूद केले. सध्या हिराणींकडे 'मुन्नाभाई 3' साठी तीन वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स तयार आहेत, ज्या सध्याच्या अनेक चित्रपटांपेक्षा सरस आहेत, पण ते परिपूर्णतेच्या शोधात आहेत.

advertisement

'सर्किट'चं नाव आधी काहीतरी वेगळंच होतं

अर्शद वारसीने एक मजेशीर किस्साही शेअर केला. त्याने सांगितलं की सुरुवातीला त्याला 'मुन्नाभाई MBBS' मध्ये काम करण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण एका टॅरो कार्ड रीडरच्या सल्ल्यानुसार तो विधू विनोद चोप्रांना भेटला. तिथे त्याची भेट राजकुमार हिराणींशी झाली आणि त्याला तो खूप आवडले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कामाचा ताण अन् अपुरी झोप, सतत जाणवतोय थकवा, वेळीच घ्या ही काळजी
सर्व पहा

परंतु अर्शदने एक अट ठेवली होती अभिनयामध्ये त्याला पूर्ण स्वातंत्र्य हवे. अर्शद सांगतो, "माझ्या पात्राचे नाव आधी 'खुजली' असे होते. पण मी ते बदलून 'सर्किट' केले. मी सेटवर संवादांमध्ये खूप सुधारणा (Improvisation) करायचो, पण हिराणींनी कधीही त्याला विरोध केला नाही." थोडक्यात सांगायचे तर, शाहरुख खानच्या 'माय नेम इज खान' मुळे मुन्ना भाई आणि सर्किटची अमेरिकेची वारी हुकली. आता नवीन स्क्रिप्टसह हे दोघे पुन्हा कधी एकत्र येतात, याकडे अवघ्या चित्रपटसृष्टीचे डोळे लागले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
शाहरुख खानमुळे संजय दत्तचा 'मुन्नाभाई 3' बनू शकला नाही? अर्शद वारसीचा धक्कादायक खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल