नीतू कपूर यांनी इंस्टाग्रामवर ‘खुल्लम खुल्ला विथ ऋषी कपूर’ या लोकप्रिय स्टेज शोचा जुना व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले, “तुम्ही नेहमी आमच्या हृदयात जिवंत राहाल, वाढदिवसाच्या शुभेच्छा.” या व्हिडिओत ऋषी कपूरचा विनोदी स्वभाव, त्यांची जादुई उपस्थिती आणि प्रेक्षकांना हसवणारे क्षण पुन्हा जिवंत झाले.
advertisement
याच स्टेज शोमध्ये रणबीर कपूरने वडिलांविषयी बोलताना म्हटले होते, “40 वर्षं इंडस्ट्रीत घालवलेला माणूस आपले किस्से प्रेक्षकांशी शेअर करतो, हे स्वतःमध्ये खूप मोठं आहे.” त्यावेळी प्रेक्षकांत बसलेल्या नीतू कपूर मनापासून हसताना दिसत होत्या.
रणधीर कपूर, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासारख्या दिग्गजांच्या प्रतिक्रिया त्या शोमध्ये झळकल्या होत्या. आज, नीतूंच्या पोस्टनंतर संजय कपूरसह अनेक सेलिब्रिटींनीही “हॅपी बर्थडे चिंटू” म्हणत ऋषीजींना आठवलं. त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिने देखील इंस्टा स्टोरीवर लिहिलं, “आम्ही दररोज तुमचा उत्सव साजरा करतो बाबा. तुम्हाला नेहमी प्रेम, आठवण आणि आदर देत राहू.”
नीतू आणि ऋषी यांनी 1980 मध्ये लग्न केलं होतं. दोघांची जोडी अमर अकबर अँथनी, रफू चक्कर, खेल खेल में, कभी कभी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत झळकली. ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे चाहत्यांनी त्यांना “गोल्डन कपल” मानलं. 30 एप्रिल 2020 रोजी ल्युकेमियाशी लढा देत ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र आजही त्यांच्या आठवणी, गाणी आणि किस्से चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत.