या सिनेमात मनोज वाजपेयी यांनी इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांची भूमिका साकारली आहे. झेंडे यांनी चार्ल्स शोभराजला दोनवेळा अटक करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं धाडस केलं होतं. तर दुसरीकडे, ‘बिकीनी किलर’ म्हणून कुख्यात असलेला शोभराजचा रोल जिम सरभने साकारला आहे.
वीकेंडला Inspector Zende पाहण्याचा करताय प्लॅन? मग आधी हा Review वाचाच
advertisement
विशेष म्हणजे या हिंदी सिनेमात मराठी कलाकारांची मोठी फौज आहे. भाऊ कदम, हरीश दुधाडे, गिरीजा ओक आणि ओंकार राऊत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे मराठी रसिकांमध्येही या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
दरम्यान, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या सिनेमाचं खास कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “शोभराजसारख्या थंड डोक्याच्या गुन्हेगारावर सिनेमा विनोदी टचसह कसा असू शकेल याबद्दल मला शंका होती. पण सिनेमा पाहिल्यावर कळलं की हेच कथानकाचं वैशिष्ट्य आहे.”
‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा थरार, विनोद आणि दमदार अभिनयाचं मिश्रण असल्यामुळे प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.