बिग बॉस सीझन संपला मात्र निक्की आणि वर्षाताईंची भांडणं संपल्याचे दिसेना. दोघींमध्ये अजूनही गैरसमज असल्याचे पहायला मिळतंय. निक्की तांबोळीने नुकतीच एक स्टोरी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलीय ज्यामुळे पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलं आहे. निक्कीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.
रिंकू राजगुरूची एकूण संपत्ती किती? एका सिनेमासाठी घेते एवढे मानधन?
advertisement
बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकमध्ये वर्षा ताईंनी आपल्या बहिणीला निक्कीची ओळख खलनायिका म्हणून करून दिली होती. हाच किस्सा त्यांनी एका कार्यक्रमातही सांगितला. आता त्या कार्यक्रमातील व्हिडिओ शेअर करत निक्कीने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे दोघींमधील वादात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.
वर्षा उसगांवकर यांचा व्हिडीओ
निक्कीने शेअर केलेल्या व्हिडिओ पोस्टमध्ये वर्षाताई सांगत आहेत, ''मी निक्कीला सीझन 5 ची खलनायिका म्हणायचे. बिग बॉसमध्ये माझी बहिण आली तेव्हा मी तिची ओळख खलनायिका म्हणून करून दिली. तिला त्याचं वाईट वाटलं. तिला मला म्हणाली ताई तुम्ही मला खलनायिका बोललात याचं मला वाईट वाटलं. मग मी त्यासाठी तिला सॉरीही म्हणाले. पण तू ज्या प्रकारे माझ्याशी वागलीस तर मी तिला नायिका थोडी म्हणणार. नायिका दिसत असली तरी वागते खलनायिकासारखी.''
nikki tamboli and ursha usgaonkar
निक्की तांबोळी काय म्हणाली?
वर्षाताईंचा हाच व्हिडिओ शेअर करत निक्की भडकली आहे. 'निक्की म्हणाली, मला खलनायिका म्हणाल्या त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. त्यावेळी त्या चुकीचे बोलल्याची त्यांनी जाणीव आहे असं म्हणाल्या. आता डबल स्टॅंडर्ड का? लोकांबद्दल कमी बोला आणि स्वतःबद्दल बोलून घर चालवा मॅडमजी.'