सप्टेंबर महिन्यात सलमान खानचे वडील आणि सीमा सजदेहच्या माजी वहिनी मलायका अरोराच्या वडिलांचे निधन झाले, त्यानंतर अरबाज खान तातडीने घटनास्थळी पोहोचला. सलमान खानही मलायका अरोरा आणि तिच्या आईच्या घरी भेटण्यासाठी पोहोचला. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले.
रिलीजच्या आधीच Singham 3 ला मोठा धक्का, महत्त्वाच्या सीन्सवर CBFC ची कात्री, कोणते बदल होणार?
advertisement
पूर्व पतीच्या कुटुंबाची केले तोंडभरून कौतुक
याबद्दल बोलताना सीमा सजदेह म्हणाली की, तिलाही सलमान खानचा हा गुण आवडतो. ती म्हणते की, कोणत्याही कठीण काळात सलमान खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब सोबत उभे असते. सीमा सांगते, 'जेव्हा कुठलीही अडचण येते, तेव्हा तो सर्वात पुढे उभा राहतो. तुम्हाला काही गरज असेल तर खान कुटुंब तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहणार आणि म्हणूनच ते एक मजबूत कुटुंब आहे.'
सलग तिसऱ्यांदा रिॲलिटी शोचा भाग झाली
या शोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यावर सीमा सजदेह म्हणाली की, रिॲलिटी शो सोपे नसतात. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडायची असते. हे अजिबात सोपे काम नाही. सीमा सजदेह या रिॲलिटी शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. पहिल्या सीझनपासून ती याचा एक भाग आहे.