TRENDING:

Dhurandhar: 'धुरंधर'साठी पाकिस्तानी मोजतायत इतके पैसे, गल्लीबोळात जाऊन फॉरेनरने केली पोलखोल, VIDEO

Last Updated:

'धुरंधर' सध्या पाकिस्तानातील कराची शहरात उजळ माथ्याने विकला जात आहे. एका युट्युबरने कराचीच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटला भेट दिली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय चित्रपटांवर पाकिस्तान सरकारने बंदी घातली असली, तरी तिथल्या प्रेक्षकांना मात्र तिथल्या सरकारला आवरणं कठीण जातंय. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग याचा अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट 'धुरंधर' सध्या पाकिस्तानातील कराची शहरात उजळ माथ्याने विकला जात आहे. एका युट्युबरने कराचीच्या प्रसिद्ध 'रेनबो सेंटर' या इलेक्ट्रॉनिक मार्केटला भेट दिली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, ज्या किमतीला ही फिल्म विकली जातेय, ते पाहून भारतीय प्रेक्षकांना मोठा धक्काच बसला आहे.
News18
News18
advertisement

भारतात आता ओटीटी आणि हायस्पीड इंटरनेटचा जमाना आहे, पण पाकिस्तानातील कराचीमध्ये आजही १०-१५ वर्षांपूर्वीचा काळ जिवंत असल्याचा भास होतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये युट्युबर एका दुकानात शिरतो, जिथे भारतीय चित्रपटांच्या पायरेटेड सीडी आणि पेन ड्राईव्हचा ढिगारा दिसतो. युट्युबर दुकानदाराला विचारतो, "हा नवीन भारतीय सिनेमा आहे का?" त्यावर दुकानदार अगदी अभिमानाने सांगतो, "हो, हा 'धुरंधर' आहे, नुकताच रिलीज झालाय."

advertisement

पाकिस्तानात तुफान गाजतोय धुरंधर

जेव्हा युट्युबरने याची किंमत विचारली, तेव्हा उत्तर मिळालं, ५० पाकिस्तानी रुपये (PKR). म्हणजे भारतीय चलनानुसार अवघ्या १६ रुपयांत अख्खा चित्रपट. भारतात जिथे मुव्ही तिकीट किमान ३००-५०० रुपयांना मिळतं, तिथे पाकिस्तानात निव्वळ एका वडापावच्या किमतीत रणवीर सिंगचा ब्लॉकबस्टर पाहायला मिळत आहे.

'या लोकांची साथ देऊन तू...', निक्कीची बॉडी शेमिंग करणाऱ्या प्रिन्स नरुलावर जान्हवीचा संताप, शिव ठाकरेलाही चांगलंच झापलं

advertisement

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, 'धुरंधर' या चित्रपटात पाकिस्तानवर कडक टीका करण्यात आली आहे. तरीही पाकिस्तानात हा चित्रपट पायरेसीच्या माध्यमातून तुफान पाहिला जात आहे. एवढंच नाही, तर नेटफ्लिक्सवरही हा चित्रपट पाकिस्तानात टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. यावर नेटिझन्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, "ज्या सिनेमात पाकिस्तानला धुतलंय, तोच तिथे सर्वात जास्त चालतोय!" तर एकाने आश्चर्याने विचारलं, "अजूनही तिथे पेन ड्राईव्हमध्ये चित्रपट भरून मिळतात? आम्ही तर हे १० वर्षांपूर्वीच विसरलोय!"

advertisement

रणवीरच्या पाकिस्तान कनेक्शनमुळे फिल्म सुपरहिट?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

व्हिडिओमध्ये युट्युबरने एक कनेक्शनही सांगितलं आहे. त्याने सांगितलं की, रणवीर सिंग हा मूळ सिंधी आहे. फाळणीच्या वेळी त्याचे आजोबा पाकिस्तानातूनच भारतात स्थलांतरित झाले होते. कदाचित या नात्यामुळेच रणवीरचे चित्रपट तिथे इतके लोकप्रिय आहेत का, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar: 'धुरंधर'साठी पाकिस्तानी मोजतायत इतके पैसे, गल्लीबोळात जाऊन फॉरेनरने केली पोलखोल, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल