TRENDING:

प्रेमात पडली पण बॉयफ्रेंडनं दाखवले असे गुण; प्राजक्ता माळीनं पहिल्यांदाच केला ब्रेकअपविषयी खुलासा

Last Updated:

प्राजक्ता कधी लग्न करणार, तिचा कोणी बॉयफ्रेंड आहे का, प्राजक्ता कधी प्रेमात पडली होती का असे प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतात. आता नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने आपल्या खाजगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्राजक्ता विषयी नेहमीच अधिकाधिक जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता असते. प्राजक्ता तिच्या खाजगी आयुष्यामुळे कायमचं चर्चेत राहते. तिच्याविषयी चाहत्यांना नेहमीच जाणून घ्यायचं असतं. प्राजक्ता तिच्या आयुष्याचे अपडेट्स सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. तरी प्राजक्ता कधी लग्न करणार, तिचा कोणी बॉयफ्रेंड आहे का, प्राजक्ता कधी प्रेमात पडली होती का असे प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतात. आता नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने आपल्या खाजगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.
प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी
advertisement

नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या लव्हलाइफविषयी बोलली आहे. याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, 'डोक्याची मंडई होणार असेल तर मला लग्नच करायचं नाही. माझ्या आयुष्यात शांततेला प्राधान्य आहे. कारण डोकं ठिकाणावर नसेल तर तर तुम्ही काहीच करू शकणार नाही.'

WHAT...? करण जोहरच्या 'या' चित्रपटात आलिया भट्टचा पत्ता कट; जान्हवी कपूरने केलं रिप्लेस

advertisement

ती पुढे म्हणाली, 'तुमचा लाइफ पार्टनर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुमचं जगणं, भविष्य, मेंटल हेल्थ सगळंच बदलतं. त्यामुळे मला असं वाटतं की लग्न ही एक रिस्क आहे. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा यावर कुठलंही नातं टिकून असतं. या कलियुगात याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. ते नातं जर खरं असेल तरच ते टिकेल.' असं मत तिने मांडलं. स्वतःच्या लव्हलाइफविषयी बोलताना ती म्हणाली, 'मी प्रेमात पडते. असं नाही की मला कधी प्रेम झालं नाही. पण नंतर मला हे जाणवतं की हे शेवटपर्यंत टिकू शकणार नाहि. मग मी त्यातून बाहेर येते.'

advertisement

पुढे प्राजक्ता म्हणाली, 'आपण थांबूया असं मी स्वतःलाच पाच वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. तो माझ्याशी खोटं बोलायचा. मी त्याचं खोटं पकडलं होतं. पण तो ते मान्य करतच नव्हता. तुमच्यात खरं बोलण्याचीही हिंमत पाहिजे.' असा खुलासा प्राजक्ताने केला आहे. प्राजक्ताचा हा खुलासा ऐकून तिचा जोडीदार कोण असेल, प्राजक्ता लग्न करणार की नाही याविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. काही दिवसांपूर्वीच ती 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटात दिसली होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळवू शकला नाही. आता यानंतर प्राजक्ताच्या आगामी सिनेमाविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रेमात पडली पण बॉयफ्रेंडनं दाखवले असे गुण; प्राजक्ता माळीनं पहिल्यांदाच केला ब्रेकअपविषयी खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल