TRENDING:

Rahul Deshpande Divorce: सप्टेंबर 2024 ला घटस्फोट, एक वर्षानंतर केलं जाहीर; राहुल देशपांडेंनी सांगितलं यामागचं कारण

Last Updated:

Rahul Deshpande Divorce: राहुल देशपांडेंचा 17 वर्षांचा संसार मोडला असून त्यांनी पोस्ट शेअर करत घटस्फोटाची बातमी शेअर केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचा वारसा जपणारे लोकप्रिय गायक राहुल देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. मात्र यावेळी कारण त्यांचं गाणं नाही, तर त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. चाहत्यांना धक्का देणारी अशी बातमी त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर दिली आहे. राहुल देशपांडेंचा 17 वर्षांचा संसार मोडला असून त्यांनी पोस्ट शेअर करत घटस्फोटाची बातमी शेअर केली आहे.
 राहुल देशपांडे घटस्फोट
राहुल देशपांडे घटस्फोट
advertisement

राहुल यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही बातमी शेअर केली. खरंतर त्यांचा घटस्फोट वर्षभरापूर्वीच झालाय. मात्र ही बातमी त्यांनी वर्षभरानंतर शेअर केली. त्यांनी ही बातमी उशिरा सांगण्याचं कारणही पोस्टमध्ये सांगितलं.

राहुल देशपांडेचा घटस्फोट, 17 वर्षानंतर संसाराचे सूर बिघडले

राहुल देशपांडे पोस्टमध्ये म्हणाले, "तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या प्रवासात आपापल्या परीने एक महत्त्वाचा भाग निभावला आहे आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाचे अपडेट शेअर करायचे आहे. तुमच्यापैकी काही जणांना मी ही बातमी आधीच सांगितली आहे."

advertisement

"17 वर्षांच्या संसारानंतर आणि कितीतरी अविस्मरणीय आठवणींनंतर मी आणि नेहाने परस्पर सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे कायदेशीर विलगीकरण सप्टेंबर 2024 मध्ये सौहार्दपूर्णरित्या पूर्ण झाले. मी हे अपडेट शेअर करण्यापूर्वी काही वेळ घेतला. जेणेकरून या बदलाच्या प्रक्रियेला मी खाजगीरित्या हाताळू शकेन आणि सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. विशेषतः आमची मुलगी रेणुका हिच्या हिताची. ती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि मी नेहा सोबत तिच्यासाठी अतुट प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास कटिबद्ध आहे."

advertisement

"हा जरी आमच्या वैयक्तिक आयुष्यातील एक नवीन अध्याय असला, तरी पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर आजही तितकाच घट्ट आहे. या काळात तुम्ही माझ्या गोपनीयतेचा आणि निर्णयाचा आदर कराल अशी आशा आहे."

दरम्यान, ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी धक्का व्यक्त केला, तर काहींनी राहुल आणि नेहा यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rahul Deshpande Divorce: सप्टेंबर 2024 ला घटस्फोट, एक वर्षानंतर केलं जाहीर; राहुल देशपांडेंनी सांगितलं यामागचं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल